हिंदू सणांना विशेष महत्व आहे. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे नवरात्री. या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. याशिवाय अनेक ठिकाणी गरबा, दांडियाची आयोजन केले जाते. गरबा खेळायला जाताना सर्वच मुली लेहेंगा चोळी घालून सुंदर मेकअप करून गरबा खेळायला जातात. पण गरबा खेळून झाल्यानंतर खूप जास्त घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे चेहरा अतिशय चिकट आणि तेलकट होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही मेकअप जास्त काळ टिकून राहण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून मेकअप केल्यास त्वचेवरील मेकअप अजिबात निघून येणार नाही. (फोटो सौजन्य – istock)
गरबा खेळताना सतत घाम येतो? मग 'या' टिप्स फॉलो करा मेकअप
मेकअप करण्याआधी कायमच चेहऱ्यावर बर्फ लावावा. बर्फ लावल्यामुळे त्वचेवर केलेला मेकअप दीर्घकाळ टिकून राहतो आणि त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. बर्फाने चेहऱ्यावर १० ते १५ मिनिट मसाज करावा.
मेकअप जास्त वेळ चेहऱ्यावर टिकून राहण्यासाठी प्राइमर लावावे. प्राइमर त्वचेच्या छिद्रांमध्ये मेकअप जाऊ देत नाही. डोळ्यांचे सौंदर्य आणखीनच उठावदार दिसावे म्हणून मस्करा आणि आयलाइनर लावले जाते.
तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी मेकअप करताना मॅट बेस्ड प्रॉडक्टचा वापर करावा. मॅट बेस्ड प्रॉडक्ट त्वचेवरील चमक कायम टिकवून ठेवतात. याशिवाय त्वचेमधील अतिरिक्त तेल खेचून घेतात.
चेहऱ्यावरील काळे डाग मेकअप करताना दिसू नये नारंगी रंगाचे कन्सीलर वापरावे. यामुळे काळे डाग लपले जातात आणि मेकअप लवकर खराब होत नाही.
चेहऱ्यावर मेकअप जास्त काळ टिकून राहण्यासाठी सेटिंग स्प्रेचा वापर करावा. यामुळे मेकअप घामामुळे किंवा पाण्यामुळे निघून येत नाही.