• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Jwalamukhi Temple Himachal Pradesh Temple Where Mata Satis Tongue Fell A Divine Flame Burns Eternally

Jwalamukhi Temple : देवीच्या ‘या’ मंदिरात हजारो वर्षांपासून अखंड जळत आहे ‘ही’ अलौकिक ज्योत; जिथे पडली होती माता सतीची जीभ

Jwalamukhi Temple : ज्वाला देवी मंदिर हे हिमाचल प्रदेश, संपूर्ण देश आणि जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. येथील ज्योत इतक्या काळापासून जळत आहे की अकबर देखील त्याच्या चमत्काराने आश्चर्यचकित झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 27, 2025 | 01:59 PM
jwalamukhi temple himachal pradesh

देवीच्या 'या' मंदिरात हजारो वर्षांपासून अखंड जळत आहे 'ही' अलौकिक ज्योत; जिथे पडली होती माता सतीची जीभ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील ज्वाला देवी मंदिरात पाण्यातही जळणारी शाश्वत ज्योत आजही भक्तांचा श्रद्धास्थान आहे.
  • सम्राट अकबराने ज्वाला विझवण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरला, उलट त्याचा अहंकार देवीने मोडून काढला.
  • नवरात्रीत लाखो भाविक येथे येऊन माता सतीच्या जीभेच्या शक्तीपीठाचे दर्शन घेतात, जे जगप्रसिद्ध आहे.

jwalamukhi temple himachal pradesh : हिमाचल प्रदेशाला ‘देवभूमी'(Devbhoomi) म्हणून ओळखले जाते. इथल्या पर्वतरांगांमध्ये दडलेली अनेक शक्तीपीठं भक्तांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र आहेत. अशाच शक्तीपीठांपैकी एक म्हणजे ज्वालामुखीतील ज्वाला देवी मंदिर (jwalamukhi temple himachal pradesh) , जे हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यात वसलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हजारो वर्षांपासून अखंड जळत असलेली नैसर्गिक ज्वाला, जी पाण्यातही विझत नाही.

माता सतीची जीभ येथे पडली

पुराणकथेनुसार, भगवान शिवाच्या तांडवाला थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी माता सतीचे शरीर तुकडे केले. तिची जीभ या स्थळी पडली, आणि तेव्हापासून इथे नैसर्गिक ज्वाला जळत राहिली आहे. म्हणतात की अग्नी तत्वाशी संबंधित असल्याने ही ज्वाला कधीच विझत नाही. गर्भगृहात नऊ पवित्र ज्वाला सतत प्रज्वलित राहतात. ज्याचं दर्शन झालं, त्याचे दुःख-दरिद्र दूर होतात, असा लोकांचा विश्वास आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Palestine BRICS : ‘पॅलेस्टाईन ब्रिक्सकडे वाटचाल करताना…’; ‘असे’ झाल्यास जागतिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलणार

अकबराचा अभिमान मोडला

इतिहासात या मंदिराचा उल्लेख अनेकदा येतो. मुघल सम्राट अकबर जेव्हा आपल्या सामर्थ्याच्या गर्वात होता, तेव्हा त्याने या ज्वालेचा चमत्कार तपासण्याचे ठरवले. त्याने लोखंडी कड्या बसवून कालव्याचे पाणी मंदिरात वळवले. परंतु ज्वाला मात्र कणभरही न विझता प्रज्वलित राहिली.
यानंतर अकबराने सोन्याची छत्री अर्पण केली. त्याला वाटले की इतकी मौल्यवान भेट दुसरा कोणी देऊ शकणार नाही. पण देवीने त्याचा अभिमान स्वीकारला नाही. ती छत्री लगेच साध्या धातूमध्ये रूपांतरित झाली. हा प्रसंग आजही मंदिरात श्रद्धेने सांगितला जातो.

नवरात्रीतील विशेष महत्त्व

नवरात्रीच्या काळात या मंदिराला लाखो भाविक भेट देतात. माँ ज्वालाची आरती, दर्शन, आणि अखंड दिव्य ज्योतीचे तेज पाहताना भक्तांना अध्यात्मिक उर्जा मिळते. ‘पाण्यातही न विझणारी ही ज्योत’ भक्तांसाठी फक्त चमत्कार नाही, तर त्यांची श्रद्धा, आत्मविश्वास आणि अढळ भक्ति याचे प्रतीक आहे.

मंदिरातील पूजा व वेळापत्रक

मंदिरातील आरती ऋतूनुसार ठरवली जाते.

  • सकाळची मंगला आरती : पहाटे ५ वा. किंवा ६ वा.
  • भोग आरती : सकाळी ११:३० वा. ते दुपारी १२:३० वा.
  • संध्याकाळची आरती : सायं ७ वा. किंवा ८ वा.
  • शयन आरती : रात्री ९:३० वा. किंवा १० वा.
    हिवाळ्यात या वेळेत थोडाफार फरक होतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर

प्रवासाची सोय

  • विमानमार्गे : जवळचे विमानतळ गग्गल (५० किमी).
  • रेल्वेमार्गे : जवळचे नॅरोगेज स्टेशन, ज्वालाजी रोड (२० किमी). ब्रॉडगेज : पठाणकोट (१२० किमी).
  • रस्त्यामार्गे : दिल्ली, चंदीगड, धर्मशाळा येथून बस व टॅक्सी सहज उपलब्ध. डोंगराळ प्रवासात अप्रतिम दृश्यांचा अनुभव मिळतो.

निवासव्यवस्था

मंदिराजवळ साध्या धर्मशाळांपासून ते आलिशान रिसॉर्टपर्यंत सर्व पर्याय आहेत. भाविकांना त्यांच्या बजेटनुसार राहण्याची सोय मिळते. हिमाचलचे हे अद्भुत मंदिर श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहास यांचा संगम आहे. पाण्यातही न विझणारी ही ज्वाला भक्तांसाठी अनमोल आस्था आहे. नवरात्रीत जर तुम्ही देवभूमीकडे निघाला असाल, तर ज्वालामुखीच्या या पवित्र शक्तीपीठाला नक्की भेट द्या. इथे मिळणारी उर्जा, शांतता आणि भक्तिभाव आयुष्यभर लक्षात राहील.

Web Title: Jwalamukhi temple himachal pradesh temple where mata satis tongue fell a divine flame burns eternally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Himachal Pradesh
  • Navratri
  • Navratri 2025
  • Navratri festival

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

Feb 14, 2026 | 10:28 AM
T20 World Cup 2026 : 21 सामन्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये कोण कुठे आहे? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

T20 World Cup 2026 : 21 सामन्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये कोण कुठे आहे? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Feb 14, 2026 | 10:27 AM
Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Feb 14, 2026 | 10:17 AM
खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली

खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली

Feb 14, 2026 | 10:10 AM
पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

Feb 14, 2026 | 10:03 AM
आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

Feb 14, 2026 | 10:02 AM
Pradosh Vrat 2026: साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Pradosh Vrat 2026: साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 14, 2026 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.