आयपीएल २०२५ च्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत, त्यामुळे आता आयपीएल २०२५ मध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शन संदर्भात अनेक वृत्त समोर येत आहेत. मेगा ऑक्शनमुळे आयपीएलमधील संघाला मर्यादित खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त खेळाडूंना रिलीज करावे लागणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या नजरा आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनवर असणार आहेत. लवकरच बीसीसीआयकडून रिटेनशन पॉलिसी जारी केली जाईल, यासोबतच संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतात हेही ठरवले जाईल, उर्वरित खेळाडूंना आपोआप रिलीज केले जाईल. मेगा ऑक्शनमध्ये मोठे खेळाडू रिलीज केले तर लिलावही जोरदार होण्याची शक्यता आहे. जरी अद्याप कोणत्याही संघाने कोणालाही सोडले नाही, परंतु यावेळी त्यांच्या संघापासून वेगळे होणारे मोठे कोणते खेळाडू असू शकतात यावर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ग्लेन मॅक्सवेल - ग्लेन मॅक्सवेल हे एक नाव आहे जे आयपीएलमध्ये परिपूर्ण फटाकेबाज असल्याचे सिद्ध होते, तरीही संघ त्याला लिलावात घेण्यास तयार दिसत आहेत. गेल्या काही वर्षांतील त्याची कामगिरी पाहता आरसीबी संघ त्याला आपल्यासोबत ठेवण्यात स्वारस्य दाखवेल, असे वाटत नाही.
केएल राहुल - लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचे नाव संघ रिलीज करू शकतो असे म्हंटले जात आहे, आता केएल राहुल भारताच्या T20 संघाचा भागही नाही अशा परिस्थितीत तोही नव्या संघात दिसल्यास नवल वाटायला नको.
फाफ डू प्लेसी - आरसीबीची नेहमीच चर्चा होत असते. मेगा लिलाव तीन वर्षांसाठी आहे, त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसताना आरसीबी संघ त्याला आपल्यासोबत ठेवेल की नाही याबाबत शंका आहे.
रोहित शर्मा - IPL 2025 पूर्वी ज्या खेळाडूंना सोडले जाण्याची शक्यता आहे, त्यापैकी पहिले आणि मोठे नाव रोहित शर्माचे आहे. आयपीएलच्या शेवटच्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्ससोबत जे काही घडलं ते पाहता रोहित शर्माला कदाचित एमआयमधून सोडण्यात येईल असं वाटतंय.
कगिसो रबाडा - पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला संघ रिलीज करण्याची दाट शक्यता आहे, कारण त्याने विश्वचषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली नाही.