टेडी बिअर हे एक खेळणं आहे, जे लहानांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जगात अनेक प्रकारचे टेडी बिअर उपलब्ध आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा भयानक टेडी बिअरविषयी सांगणार आहोत ज्याच्याविषयी ऐकूणच तुमच्या अंगावर काटा येईल. आम्ही सांगत असलेली ही कथा काल्पनिक नसून खरी आहे आणि ही घटना अमेरिकेत घडून आली आहे. अमेरिकेच्या रस्त्यांवर लोकांना एक विचित्र टेडी बिअर आढळला आहे ज्याचे संपूर्ण शरीर हे मानवाच्या कातड्यापासून तयार करण्यात आले आहे.
अमेरिकेत आढळून आला मानवी कातडीपासून बनवलेला Teddy Bear, रूप इतके भयानक की पाहून सर्वांचा उडाला थरकाप
मानवी कातड्यांपासून तयार करण्यात आलेला हा टेडी बिअर कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर आढळून आला आहे. ही घटना सध्या सोशल मिडियावर खूप जास्त चर्चेक असून आज आपण या घटनेमागील संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत
ही घटना रविवारी बेअर व्हॅली रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडून आली. लोकांना एक भयानक दिसणारा टेडी बिअर आढळला ज्याला पाहताच त्याला मानवी कातडीपासून बनवल्याचा भास सर्वांना होऊ लागला
या टेडी बिअरच्या शरीरावर मानवी कातडीप्रमाणे दिसणारा एक थर लावण्यात आला होता, जो पाहताच लोकांनी पोलिसांना फोन लावला आणि या घटनेचा तपास सुरु झाला
तपासामध्ये हे स्पष्ट झाले की, हा टेडी बिअर कोणत्याही मानवी त्वचेपासून तयार करण्यात आला नाही तर फॉरेन्सिक तपासणीत असे समजले की, हा टेडी बिअर संपूर्णपणे कृत्रिम आहे आणि मानवी त्वचेशी संबंधित याचा कोणताही संबंध नाही
तपासात असे समजले की, हा टेडी बिअर एका वेबसाइटवरुन खरेदी करण्यात आला आहे आणि मानवी त्वचेपासून बनवल्याचा दावा करुन वेबसाइटवर त्याला विकले जात आहे. हा दावा खोटा असून ही केवळ एक मार्केटिंग ट्रिक आहे
दक्षिण कॅरोलिना येथील कलाकार रॉबर्ट केली यांनी फेसबुकवर सांगितले की त्यांनी हा टेडी बेअर बनवला आहे. खऱ्या त्वचेच्या लूक देण्यासाठी यात काही विशेष रंगांचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या हा टेडी बिअर पोलिसांनी जप्त केला आहे