आयुष्मान वय वंदना कार्ड मिळविण्यासाठी कसा अर्ज करावा (फोटो सौजन्य - iStock)
तुम्हाला माहिती आहे का की भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या वृद्धांना लक्षात घेऊन एक विशेष आयुष्मान वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना केवळ स्वस्तच नाही तर पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. प्रथम हे आयुष्मान वय वंदना कार्ड काय आहे आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकते ते जाणून घेऊया. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
खरं तर हे कार्ड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा एक भाग आहे आणि याअंतर्गत, ७० वर्षे किंवा त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय कव्हर दिले जात आहे. तुम्ही ते केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच नाही तर सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्येदेखील वापरू शकता.
मिळालेल्या माहिनुसार, या योजनेत २७ वैद्यकीय विशेषता आणि सुमारे १,९६१ उपचार आणि प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर यामध्ये शस्त्रक्रिया, आयसीयू काळजी, निदान चाचण्या आणि इतर अनेक गंभीर आजारांवर उपचारदेखील समाविष्ट आहेत.
iPhone 17 Series च्या लॉन्च आधी iPhone 16e च्या किमतीत मोठी घसरण, 10,000 हून अधिक स्वस्त!
आयुष्मान वय वंदना कार्डचे फायदे मिळविण्यासाठी तुमचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. तुम्ही तुमच्या वयाची ७० वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची उत्पन्न मर्यादा, सामाजिक स्थिती किंवा आर्थिक पात्रतेची कोणतीही अट नाही. यामुळे वरिष्ठ नागरिकांना फायदा मिळू शकतो.
या कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. नक्की कशा स्पेप्स वापरून तुम्ही यासाठी अर्ज करून शकता जाणून घेऊया