केसांच्या वाढीसाठी शरीरात योग्य प्रमाणात बायोटिन असणे आवश्यक आहे. यामुळे केसांची मूळ मजबूत राहतात. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. अचानक केस गळणे, केसांमध्ये टक्कल पडणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पण अनेक लोक या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. असे न करता आहारात बायोटिनयुक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली बायोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात निर्माण झालेली Biotin ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
अंड्यांमध्ये विटामिन बी, प्रथिने, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळून येते.त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक किंवा दोन उकडलेली अंडी खावीत. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
वाटाणे, सोयाबीन आणि मसूर धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात सोयाबीन आणि शेंगदाण्याचे आठवड्यातून दोनदा सेवन करावे.
फायबर युक्त सुका मेवा शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे. मूठभर सुका मेवा नियमित खाल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल.
उपवासाच्या दिवसाची रताळी आवडीने खाल्ली जातात. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रताळी खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बायोटिन आढळून येते.
ब्रोकोली खायला कोणताच आवडत नाही. पण फायबर, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे अ आणि क मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुम्ही ब्रोकोली शिजवून किंवा ग्रील करून खाऊ शकता.