'हे आरक्षण टिकणार नाही...'; माजी न्यायाधीशांनी स्पष्टचं सांगितलं
Maratha Reservation News: मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे ५ व्या दिवशी उपोषण यशस्वी ठरले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या सहा प्रमुख मागण्या मान्य केल्या. विशेष म्हणजे सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत सकारात्मक तोडगा काढला.
मनोज जरांगे यांनी मुख्यतः हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती. सरकारने ही मागणी मान्य करत संबंधित जीआर (Government Resolution) काढण्याचे आदेश दिले आहेत. याप्रमाणे, मराठा समितीने ही बाब मान्य केली असून, गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही समितीने सांगितले आहे. सरकारच्या मसुदा जीआरला अभ्यासकांनी देखील मान्यता दिली आहे.
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या, यानंतर मराठा आंदोलकांनी आनंदोत्सव साजरा केला. आपण जिंकलो, अशा शब्दांत जरांगे यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केले. पण मुंबईत सुरू असलेल्या या सर्व पाच दिवसांच्या घडामोडींबाबत आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबात माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे-पाटील यांनी मात्र महत्त्वाचे विधान केलं आहे. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीत बसणार नाही, जीआर पाहून मी हतबल झालो, असं बी.जी. कोळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
‘एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला काय मिळाले ? असा सवाल बी.जी. कोळसे पाटील यांनी उपस्थित केला. जरांगे पाचील यांना फोन करून मी रडून सांगितलं होतं. तुम्ही हे बरोबर करत नाही, यातून मराठा समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. तुझ्या तब्येतीचे नुकसान होणार आहे.’ या जीआरचा सगळा मजकूर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आले, तुम्हाला ज्यांचं तोड बघायला नको,त्या सर्वांकडे म्हणजे, तलाठ्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहायक अधिकाऱ्यांकडे जावंच लागणार आहे. त्यानंतरही हे थांबणार नाही, शेवटी यात न्यायालय देखील असणार आहे. हे जे तुम्हाला कबूल करण्यात आले आहे ते कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर बसणारं नाही. कायदेशीर आरक्षण द्यायचे असेल तर ते केंद्र आणि राज्य सरकार यांना मिळूनच द्यावे लागणार. असही कोळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
देशभरात पावसाचा कहर सुरूच; पंजाबमध्ये पूर, उत्तराखंड-जम्मूमध्ये भूस्खलन, रस्ते वाहतूक ठप्प
कोळसे पाटील यांनी 1976 पासून चालत आलेल्या अनुभवाचा आधार देत धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले की, मरण, पोलिस आणि तुरुंग यांना न घाबरत 100 टक्के खरं बोलून टिकेचा धनी होण्यासाठी ते तयार आहेत. डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणे” म्हणजे काय हे आता त्यांना पूर्ण समजले आहे. त्यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांना आवाहन केले आहे की, त्यांनी दिलेली सर्व वचनं कायदेशीर पद्धतीने ठरवूनच दाखवावीत,” असही कोळसे पाटील यावेळी म्हणाले.