तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, तसतसं आपल्याला जगात नवनवीन चमत्कार घडताना दिसून येत आहे. असाच एक चमत्कार आता दुबईत दिसणार असल्याचे समजत आहे. आपण आजवर जमिनीवर बांधलेल्या इमारती पाहिल्या आहेत, अगदी अवकाशाला टेकतील इतक्या उंच इमारतीही पाहिल्या असतील मात्र तुम्ही कधी अवकाशात उडणाऱ्या इमारती पाहिल्या आहेत का? एका अमेरिकन फर्मने अशा इमारतीचा आराखडा सादर केला आहे जो जमिनीवर उभी राहणार नाही तर ढगांमध्ये आकाशात लटकलेला दिसेल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जमिनीवर नाही तर अवकाशात बांधल्या जातील इमारती, भविष्यासाठी दुबईचा मोठा प्लॅन; दृश्य उडवतील तुमचे होश
न्यू याॅर्कमधील आर्किटेक्चरल फर्म क्लाउड्स आर्किटेक्चर ऑफिसने 'अनालेमा टॉवर' नावाच्या या गगनचुंबी इमारतीची संकल्पना आखली आहे. याची उंची आणि डिजाईन तुमचे होश उडवेल
मुख्य म्हणजे हे टाॅवर जमिनीशी जोडलेले नसेल परंतु एका मजबूत केबलद्वारे त्याला अवकाशात फिरणाऱ्या लघुग्रहाला लटकावले जाईल
यात इमारतीचा पाया अवकाशात असेल. युनिव्हर्सल ऑर्बिटल सपोर्ट सिस्टम (UOSS) नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित, हा प्रकल्प स्पेस लिफ्ट संकल्पनेला एक पाऊल पुढे नेईल. हा टॉवर जमिनीवर कोणत्याही ठिकाणी बांधता येतो आणि नंतर हवेत हलवता येतो. यासाठी दुबई हे एक संभाव्य ठिकाण मानले गेले आहे
विजेची गरज पूर्ण करण्यासाठी, ते पृथ्वीच्या वातावरणाच्या वर असलेल्या आणि २४x७ सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या सौर पॅनेलचा वापर करणार आहे. पाण्यासाठी, त्यात एक अशी प्रणाली वापरण्यात येईल जी ढग आणि पावसातील ओलावा गोळा करेल आणि त्याचा पुनर्वापर करेल, यामुळे स्वावलंबी जीवन जगता येईल
केबल-लेस मॅग्नेटिक लिफ्ट तंत्रज्ञानामुळे, टॉवर कोणत्याही अडथळ्याशिवाय पारंपारिक लिफ्टपेक्षा अनेक पटींनी अधिक उंचीवर पोहचू शकेल. हा प्रकल्प भविष्याची एक झलक असेल ज्यात पृथिवीवरील जागेची कमतरता लक्षात घेऊन मानव थेट अवकाशाला आपले नवीन घर बनवेल