(फोटो सौजन्य: X)
मृत्यूच्या विळख्यात अडकल्यानंतर एक हॉस्पिटलच असे ठिकाण असते जिथे आपल्याला जीवनदान मिळू शकते. रुग्णालयात पोहचेपर्यंत रुग्णाचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु असतो. पण विचार करा जर वाचवणाऱ्यानेच तुमचा जीव घेतला तर या परिस्थितीवर तुमची काय टिप्पणी असेल. सध्या सोशल मीडियावर एक महामार्गावरील धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जीव वाचवण्यासाठी ओळखली जाणारी रुग्णवाहिकाच रुग्णाच्या मृत्यूचे कारण ठरताना दिसून आली. व्हिडिओतील दृश्ये फारच चकित करणारी होती. युजर्सने कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणावर टीका व्यक्त केली आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
शिक्षणाला वयाचं बंधन नसतं! गुलाबी लुगड्याचा गणवेश अन् ‘आजीबाईची अनोखी शाळा’ पाहिलीत का? Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, रुग्णवाहिकेचा निव्वळ आणि उघड निष्काळजीपणा स्पष्ट दिसून आला. महामार्गावरून हॉस्पिटलच्या दिशेने जात असणाऱ्या या रुग्णवाहिचा दरवाजा अचानक उघडला गेला ज्यामुळे स्ट्रेचरसह रुग्ण रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओत दिसून आले. मुख्य म्हणजे ड्रायव्हरला शेवटपर्यंत ही बाब लक्षात येत नाही आणि तो वेगाने रुग्णवाहिका चालवत राहतो. ही संपूर्ण घटना मागून येणाऱ्या कारमधील लोकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली. व्हिडिओतील दृश्ये भीषण असून युजर्सने यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान ही घटना नक्की कुठली आणि कधीची आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही पण घटनेच्या व्हिडिओने मात्र इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
Patient heard how much the ambulance ride costs and dipped mid-route 💀 pic.twitter.com/df5uhPiW0r — 𝓥𝓘𝓓𝓔𝓞 (@videomuzk) November 13, 2025
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @Parody account नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ड्रायव्हर इतका कसा अनभिज्ञ असू शकतो? यावरून तो किती प्रशिक्षित आहे आणि व्यवस्थापनाची उदारता दिसून येते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरंच घडलं आहे का? ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला हे एआय वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






