फोटो सौजन्य- pinterest
मार्गशीर्ष महिन्यातील पहिले प्रदोष व्रत सोमवारी येते. या दिवशी सोमवार असल्याने त्याला सोम प्रदोष व्रत असे म्हटले गेले आहे. मार्गशीर्ष महिना हा देवांचा प्रिय महिना मानला जातो. या दिवशी उपवास करणे खूप फायदेशीर ठरते. हा दिवस महादेव आणि देवी पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. या काळात महादेवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचसोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडथळे दूर होतात. जाणून घ्या सोम प्रदोष व्रत कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.47 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.12 वाजता संपणार आहे. अशा वेळी सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी सोम प्रदोष व्रत पाळले जाणार आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी हे व्रत संध्याकाळी पाळले जाणार आहे. सूर्यास्तानंतरचे पहिले 1.5 तास प्रदोष काळ मानले जातात. या काळात महादेवांची पूजा करणे त्यांना पाणी अर्पण करणे आणि प्रदोष स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.
यावेळी सोम प्रदोष व्रताच्या वेळी प्रीती आणि आयुष्मान योग तयार होत आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी अभिजित मुहूर्त योग देखील तयार होत आहे. आयुष्मान योगात महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि उपवास करण्याचे व्रत घ्यावे. संपूर्ण दिवस उपवास करावा आणि प्रदोष काळाच्या वेळी भगवान शिवाचे पंचामृत अभिषेक करावे. यानंतर महादेवाला बेलपत्र, धतुरा, चंदन, धान्य आणि फुले अर्पण करा. त्यानंतर शिव चालीसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा. पूजा झाल्यानंतर आरती करुन घ्या. त्यानंतर सर्वांना नैवेद्य वाटा. पूजा पूर्ण झाल्यानंतर उपवास सोडा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सोम प्रदोष व्रत सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी आहे
Ans: सोम प्रदोष व्रताच्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.47 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.12 वाजता संपणार आहे.
Ans: प्रदोष व्रताच्या दिवशी प्रीती आणि आयुष्मान योग तयार होत आहे.






