सततच्या धावपळीमुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. यामुळे आहारात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. चुकीचा आहार आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीरात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत आजारपण वाढू लागते. याशिवाय शरीरातील लाल रक्तपेशी कमी होऊन शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घ्या सविस्तर. (फोटो सौजन्य – iStock)
अनिमियाची समस्या होईल कायमची दूर! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
नियमित आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले पोषक घटक शरीरात रक्त वाढण्यास मदत करतात. हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्यास थकवा, अशक्तपणा दूर होईल.
आहारात बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर इत्यादी ड्रायफ्रूटचे सेवन केल्यास थकवा कायमचा दूर होईल. याशिवाय शरीर निरोगी राहील. ड्रायफ्रुटमध्ये लोह आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
थकवा, अशक्तपणा किंवा वारंवार चक्कर येत असेल तर दूध किंवा दुधापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील लोहाची आणि विटामीन बी १२ ची कमतरता दूर होईल.
रोजच्या आहारात महिलांनी लिंबूवर्गीय फळांचे नियमित सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही संत्री, गोड लिंबू, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी आणि पपई, पेरू इत्यादी अनेक फळांचे सेवन करू शकता.
हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास आहारात बीट आणि गाजरचे नियमित सेवन करा. बीट गाजर खाण्यास काहींना आवडत नाही. अशावेळी तुम्ही बीटगाजरचा रस पिऊ शकता.