लग्नसराईच्या दिवसांमध्ये दागिन्यांची मोठी प्रमाणावर खरेदी केली जाते. सुंदर सोन्याचा नेकलेस, अंगठी, बांगड्या इत्यादी अनेक दागिने आवडीने विकत घेतले जातात. त्यातील पारंपरिक दागिना म्हणजे गोठ. लग्नात किंवा ऑफिसवेअर मध्ये टिपिकल बांगड्या घालण्याऐवजी नाजूक साजूक डिझाईनचे गोठ घालावे. गोठ घातल्यामुळे पारंपरिक आणि रॉयल लुक येतो. पारंपरिक दागिन्यांची सगळीकडे मोठी क्रेझ आहे. त्यामुळे लग्नापासून ते ऑफिसवेअरमध्ये तुम्ही या डिझाईनचे गोठ परिधान करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नापासून ते ऑफिसपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात हातांमध्ये शोभून दिसतील १ ग्रॅम सोन्याचे लेटेस्ट फॅशन सुंदर गोठ

नवी नवरी, तरुण मुलींपासून ते अगदी वयस्कर महिलांप्रमाणे प्रत्येकालाच लग्नात स्टायलिश आणि पारंपरिक दागिना घालण्यास हवा असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे गोठ हातांमध्ये घालू शकता.

नऊवारी, पैठणी किंवा रॉयल लुक देणारी साडी नेसल्यानंतर त्यावर या डिझाईनचे गोठ घालावेत. गोठ घातल्यानंतर हातांमध्ये कोणत्याही रंगीत बांगड्या घालण्याची आवश्यकता भासणार नाही.

पूर्वीच्या काळी वजनाने जड आणि बारीक नक्षीकाम करून तयार केलेले गोठ हातांमध्ये परिधान केले जायचे. गोठ दागिना घातल्यानंतर रॉयल लुक दिसतो.

अनेकांना अतिशय हलके आणि नाजूक साजूक दागिने घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे सुंदर गोठ हिरव्या बांगड्यांमध्ये घालू शकता.

लग्नातील नऊवारी साडीवर इतरांपेक्षा हटके आणि रॉयल लुक हवा असेल तर या डिझाईनचे हेवी गोठ परिधान करावेत.






