सर्वच महिलांच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या साड्या असतात. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या दिवशी महिला साडी नेसतात. साडीवरील लुक आणखीनच सुंदर आणि उठावदार दिसावा म्हणून साडीवर वेगवेगळ्या पॅटर्न्सचे ब्लाऊज शिवून घातले जातात. पण नव्या पैठणी किंवा कांजीवरम सिल्क साडीवर नेमका कशा पॅटर्न्सचा ब्लाऊज शिवावा, हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लेटेस्ट पॅटर्न्सचे काही सुंदर ब्लाऊज डिझाईन सांगणार आहोत. या डिझाईनचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
कोणत्याही साडीवर शोभून दिसतील 'या' पॅटर्न्स ब्लाऊज, इतरांपेक्षा दिसेल हटके आणि स्टायलिश लुक
काहींना अतिशय मॉर्डन आणि एलिगंट लुक हवा असतो. अशावेळी तुम्ही डीप व्ही नेक पॅटर्नचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. डीप व्ही नेक पॅटर्न कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसतो.
कॉटन किंवा सिल्क साडीवर तुम्ही बोट नेक पॅटर्न्सचा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. बोट नेक ब्लाऊज कोणत्याही साडीवर उठावदार दिसतो. बोट नेक ब्लाऊज कमी उंची असलेल्या महिलांवर सुंदर दिसतो.
इतरांपेक्षा हटके आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही कॉलर नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. कॉलर नेक ब्लाऊज प्रामुख्याने डिझायनर साडीवर परिधान केले जातात.
सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच महिला पैठणी साडी खरेदी करतात. पैठणी साडीवर तुम्ही बॅकलेस, टाय - अप ब्लाऊज किंवा आरी वर्क केलेले ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
स्वीटहार्ट नेक ब्लाऊजची महिलांमध्ये मोठी क्रेझ आहे. साऊथ इंडियन फॅब्रिक असलेल्या साडीवर स्वीटहार्ट नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यामध्ये अनेक वेगवेगळ्या पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.