धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यसंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आहारात सतत होणारे बदल, गोड पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणामन आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली मधुमेहाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' फळे ठरतील वरदान
मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोक पपईचे सेवन करू शकता. पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पचनसंबंधित सर्व समस्या दूर होतात.
किवी खाल्यामुळे शरीराच्या कमी झालेल्या पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते त्यामुळे नेहमीच किवीचे सेवन करावे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी किवी हे फळ खावे.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. पेरूचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
रोजच्या आहारात ब्लुबेरी, स्ट्रॉबेरी किंवा तुतीचे सेवन करावे. चवीला आंबट असलेली ही फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर अधिक प्रमाणात आढळून येते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ हे फळ अतिशय प्रभावी आहे. जांभुळच्या बियांपासून ते अगदी सालीपर्यंत सगळ्याच गोष्टी उपयोगी आहेत. यामध्ये असलेले जाम्बोलिन आणि जाम्बुसिन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.