फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 17 ऑगस्टचा दिवस यावेळी चंद्र वृषभ राशीमध्ये संक्रमण करेल. आज रविवार असल्याने आजचा दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य असेल. तर चद्र उच्च होऊन सुनाफ योग तयार करेल. त्यासोबतच रोहिणी नक्षत्रामध्ये सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग तयार होईल. तसेच सूर्य स्वतःच्या राशीत संक्रमण करत असल्याने आदित्य योग तयार होईल. रवि योग आणि सूर्य देवाच्या कृपेमुळे आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. त्यासोबतच करिअर आणि व्यवसायामध्ये सर्वांगीण फायदे होतील. रवी योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भाऊ, बहिणी आणि घरातील वडीलधाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. यावेळी तुम्हाला परदेशातून लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आयात आणि निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्यांना लोकांना पैसे कमविण्यासाठी नवीन संधी मिळतील. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, लॅब, तंत्रज्ञ इत्यादीशी संबंधित असणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. त्याचसोबत तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. सरकारी कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांना आज अपेक्षेपेक्षा चांगला फायदा होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी इच्छित काम मिळू शकेल. यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. तुमच्या वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. तुम्हाला तुमची इच्छित बदली अनपेक्षितपणे मिळू शकते. जर तुम्हाला एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला मालमत्तेचे फायदे मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. ज्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला फायदा होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)