आयपीएल 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा लिलाव 24-25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. लिलावापूर्वी, सर्व 10 संघांनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि लिलावासाठी 1,500 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केल्याने स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर अनेक मोठे खेळाडू आहेत ज्यांना फ्रॅन्चायझींनी रिलीज केले आहे. त्याचबरोबर ज्यांना गेल्या मोसमात खेळण्यासाठी करोडो रुपये मानधन मिळाले होते, पण ते यावेळी विकले जाऊ शकणार नाहीत असा अंदाज वर्तवला जात आहे यामध्ये कोणते खेळाडू असू शकतात यावर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रिले रुसो - दक्षिण आफ्रिकेचा रिले रुसो पंजाब किंग्जकडून खेळताना रुसो आयपीएल 2024 मध्ये ट्रम्प कार्ड ठरू शकला नाही. गेल्या मोसमात खेळण्यासाठी त्याला 8 कोटी रुपये मिळाले, पण अलीकडची कामगिरी पाहता यावेळी कोणताही संघ रुसोवर बाजी मारेल अशी शक्यता फारच कमी दिसते.
अल्झारी जोसेफ - वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान कामगिरीने कहर करत आहे. पण आयपीएलच्या 22 सामन्यांत केवळ 21 विकेट आणि 9.55 चा इकॉनॉमी रेट ही त्यांच्यासाठी मेगा ऑक्शनमध्ये धोक्याची घंटा आहे.
डेव्हिड विली - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली हा आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार होता, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याने हंगामातून आपले नाव मागे घेतले. गेल्या मोसमात खेळण्यासाठी त्याला एलएसजीकडून २ कोटी रुपये मिळणार होते.
जे रिचर्डसन - ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जे रिचर्डसनला आयपीएल 2024 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 5 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या मोसमात दुखापतीमुळे तो एकच सामना खेळू शकला होता. भारतीय खेळपट्ट्यांवर विकेट काढू न शकल्यामुळे रिचर्डसनला यावेळी कोणत्याही फ्रँचायझीने विकत घेतले नाही.
स्पेन्सर जॉन्सन - ऑस्ट्रेलियाचा स्पेन्सर जॉन्सन त्याच्या वेगामुळे चर्चेत आला. 2024 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. सततच्या अपयशामुळे त्याला यावेळीही आयपीएल करार गमवावा लागू शकतो. गेल्या मोसमात खेळण्यासाठी त्याला 10 कोटी रुपये मिळाले.