सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. तसेच चहासोबत सकाळच्या नाश्त्यात अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण उपाशी पोटी चहासोबत चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे चहासोबत कोणतेही तिखट किंवा तेलकट पदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते. आज आम्ही तुम्हाला चहासोबत घरात शिल्लक राहिलेले कोणते अजबगजब पदार्थ खाल्ले जातात. (फोटो सौजन्य – istock)
चहामध्ये बुडवून खाल्ले जाणारे 'हे' विचित्र पदार्थ शरीरासाठी ठरतील धोकादायक
सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक चहासोबत चपाती खातात. चहा चपाती खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. शिल्लक राहिलेली चपाती फेकून न देता, चहासोबत खाल्ली जाते.
दिवाळी किंवा इतर वेळी घरात भाजणीची चकली किंवा भाजणीच्या पिठापासून आणलेले पदार्थ चहासोबत खाल्ले जातात. चहामध्ये चकली बुडवून मऊ करून खाल्ली जाते.
तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून बनवलेली इडली अनेकांच्या घरात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवली जाते. इडली आणि चहा असे कॉम्बिनेशन अनेकांना खायला खूप जास्त आवडते.
लहानपणाची आठवण म्हणजे चहा आणि सुके पोहे. चहासोबत सुके पोहे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चहामध्ये पोहे भिजवल्यानंतर ते अतिशय मऊ होतात आणि चवीला सुंदर लागतात.
भाजी किंवा पुरीसोबत खाण्यासाठी पुरी बनवली जाते. पण शिल्लक राहिलेल्या चहासोबत गरम करून खाल्ल्या जातात. चहा पुरीचे कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते.