2017 साली प्रदर्शित झालेला इंग्रजी भाषेतील चित्रपट 'Time Trap' Sci-Fi सिनेप्रेमींसाठी खजिन्यापेक्षा कमी नाही. साहस, थरार आणि वेळेने विणलेल्या जाळ्यात अडकलेल्या काही विद्यार्थ्यांची ही कथा प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत सिनेमात गुंतवून ठेवते. हा सिनेमा नक्की पहा.
Time Trap ही Movie नक्की पहा. ( फोटो सौजन्य - Social Media )
जगामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी वेळेनुसार घडते. पण काही ठिकाणं अशी आहेत जेथे वेळ सारखी नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Time Trap सिनेमा! या सिनेमाची कथा काल्पनिक आहे.
आपल्या प्रोफेसरच्या शोधात एका गुहेत गेलेले काही विद्यार्थी वेळेने विणलेल्या एका जाळ्यात कशाप्रकारे अडकतात आणि त्यातून कशाप्रकारे स्वत:ला बाहेत काढतात, हे सगळं सिनेमात दाखवण्यात आले आहे.
मुळात, जेव्हा ते विद्यार्थी त्या गुहेतून बाहेर येतात, तेव्हा बाहेर सर्व काही बदललेले असते. गुहेत काही दिवसचं उलटून जातात. पण बाहेर काही लाखो-हजारो वर्ष उलटून गेलेले असतात.
वाढत्या प्रदुषणामुळे पृथ्वीचा नाश झालेला असतो आणि सगळी जणं परग्रहावर राहण्यासाठी गेली असतात.
त्या विद्यार्थ्यांच्या या गुफेतील प्रवासामध्ये ते अनेक माणसांना भेटतात. यातील काही आदिमानव असतात तर काही भविष्यातील माणसं असतात. तुम्हाला हा सिनेमा YouTube वर पाहता येईल.