लग्नाचा हंगाम सुरु झाला असून महिलांच्या शाॅपिंगलाही आता सुरुवात झाली आहे. तुमचा ब्राईडल लुक पूर्ण करण्यासाठी पायात सुंदर आणि नाविण्यपूर्ण पैंजणांची जोड तुमच्या ओव्हरऑल लुकला आणखीन बहारदार बनवेल. सध्या प्रत्येकालाच आपल्याकडे काही वेगळं हवं असं वाटतं असतं अशात पैंजण निवडताना आळस कशाला... काही सुंदर आणि हेवी डिझाइन्स अलिकडे इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होत आहेत. पैंजण घेण्याचा विचार करत असाल तर या ट्रेंडी डिझाईन्सवर एकदा जरुर नजर टाका.
हेवी पैंजणचे 5 ब्राइडल डिजाइन्स होत आहेत प्रचंड व्हायरल; लग्नसमारंभात करा यांचीच निवड

पोलकी मणी आणि घंट्यांनी सजवलेले पट्टे पायांना स्टाईशिल आणि सुंदर लुक देऊन जातात. हे दिसायला हेवी असले तरी त्यांचे वजन फारसे नाही आणि ते पायांना एक आरामदायी अनुभव देतात. लग्न किंवा कोणत्याही पारंपारिक समारंभासाठी तुम्ही याची निवड करु शकता.

लग्नाच्या सीजनसाठी वधूसाठी अँकलेट सध्या फार चर्चेत आहे. मोठे स्टोन्स पैंजणांना नेकलेससारखा लुक देतात पण पायांत ते आणखीन आकर्षित वाटतात. यामुळे फोटोजमध्ये वधूचा लुक आणखीनच खुलुन येतो.

या हेवी पैंजणाची रचना देखील फार सुंदर आणि आकर्षक आहे. स्टोन आणि मोत्यांनी जडलेले हे पैंजण पायांचे सौंदर्य वाढवते आणि परंपरेला आधुनिक टच देते.

साध्या पण आकर्षित अशा पैंजणाच्या तुम्ही शोधात असाल तर हलक्या पांढऱ्या रंगाचा अँकलेट तुमचा लुक आकर्षक बनवेल. मोत्यांनी जडलेले पांढरे स्टोन आणि नाजूक घंटा साधा पण पैंजणांना शाही टच देतात.

आजकाल पारंपारिक चांदीचे पैंजण देखील फार ट्रेंडमध्ये आहेत. ते वधूला शाही लुक मिळवून देतात आणि चालताना यातून येणारा छुमछुम आवाज मनाला सुखावणारा ठरतो. भरगच्च घुंगरुंनी भरलेले हे पैंजण सुंदर पण पारंपारिक लुकसाठी परफेक्ट आहेत






