Inflammation: सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या पायाला किंवा चेहऱ्यावर सूज येते. पाय फुगल्यासारखे वाटते. पण शरीराला वारंवार येणारी सूज सामान्य नसून शरीरसंबंधित आजारांची गंभीर लक्षणे असू शकतात. दुखापत, संसर्ग, चुकीचा आहार, वाढता तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरातील सूज जास्त वेळ टिकून राहिल्यास सांधेदुखी, पचनाच्या समस्या, त्वचेच्या समस्या आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढू शकतो. त्यामुळे शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी आहारात या सुपरफुड्सचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – istock)
दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा 'या' सुपरफूड्सचा समावेश

हळदीमध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे शरीराला आलेली सूज कमी होते. यासाठी एक ग्लास गरम दुधात हळद मिक्स करून प्यावी किंवा सकाळी उठल्यानंतर हळदीचे पाणी प्यावे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे शक्तिशाली दाहशामक संयुग असते.

बेरिजमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि सूज कमी होते. ब्लूबेरी शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात.

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारख्या वेगवेगळ्या चरबीयुक्त माशांचा समावेश करावा. हे मासे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात.

टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आढळून येते. त्यामुळे टोमॅटोचा रस किंवा कच्चा टोमॅटो खावा.

आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचा एक विशेष घटक आढळून येतो. ज्यामुळे सांधेदुखी आणि शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी करून प्यायल्यास फरक दिसून येईल.






