बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आज अभिनेत्रीने अक्षय्य तृतीयेनिमित्त सोशल मीडियावर स्वतःचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या चर्चेत आहे. ९० दशकातील अभिनेत्री अजूनही चाहत्यांच्या मनावर भुरळ घालत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्यावर प्रेक्षकांच्या भरभरून कंमेंट येत आहेत. पाहुयात अभिनेत्रीने शेअर केलेला फोटोमधील मराठमोळा लुक.
अक्षय्य तृतीयेला उर्मिला मातोंडकरच्या मराठमोळ्या अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ! (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आज अक्षय्य तृतीयानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. तसेच याचनिमित्ताने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीसोशल मीडियावर जबरदस्त साडी मधील मराठमोळा लुक शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे.
उर्मिला मातोंडकरयांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सुंदर सिल्क साडी परिधान केली आहे. ज्याचा रंग लाल आहे. अभिनेत्रीचा हा लुक पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत.
उर्मिला मातोंडकर यांनी या लाल रंगाच्या साडीवर आकर्षित दागिने देखील परिधान केले आहेत. ज्यामुळे त्यांचा लुक अधिक परिपूर्ण झाला आहे. तसेच त्यांनी हातात डायमंन कडा आणि बोटात अंगठी देखील घातली आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी या साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी सुंदर आणि मोहक मेकअप देखील केला आहे. ज्यामध्ये लाल लिपस्टिक, लाल बिंदी आणि जाड भुवया केल्या आहेत. तसेच त्यांनी त्यांचे चमकते मोठे केस मोकळे ठेवले आहेत.
उर्मिला मातोंडकर यांचा हा लुक पाहून चाहते त्यांचे खूप कौतुक आहेत आहेत. तसेच अभिनेत्रीला देखील ते अक्षय्य तृतीयानिमित्त शुभेच्छा देत आहेत.