कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या उर्वशी रौतेलाचा आज वाढदिवस आहे. २५ फेब्रुवारी १९९४ जन्मलेली उर्वशी आज तिचा ३१ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. आपल्या आरस्पानी सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांना घायाळ करणारी उर्वशी अभिनयात सपशेल अपयशी ठरली आहे. आजवर तिचे अनेक रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...
Urvashi Rautela Net Worth
उर्वशीकडे एकही हिट सिनेमा नसताना तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशीकडे एकूण ३० मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल २५० कोटींहून अधिकची संपत्ती आहे. उर्वशीची महिन्याची कमाई सुमारे ४५ लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते.
उर्वशी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती रॅम्प वॉक, फोटोशूट, कॉलेब्रेशनच्या माध्यमातून ती कमाई करते. उर्वशीचा सोशल मीडियावर फार मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री घसघशीत मानधन स्वीकारते. तिच्या फॅशनची आणि लूकची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते.
'डाकू महाराज' चित्रपटात ३ मिनिटांचा परफॉर्मन्स करण्यासाठी उर्वशीने ३ कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. याशिवाय, उर्वशीने 'स्कंद' चित्रपटातही ३ मिनिटांच्या 'कल्ट मामा' आयटम साँगसाठी ३ कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं.
उर्वशीकडे मुंबईमध्ये एक कोट्यवधींचं अलिशान घर असून तिच्याकडे अनेक लक्झरियस गाड्यांचा ताफा देखील आहे. उर्वशी पंधराव्या वर्षीच सौंदर्यवती झाली होती. तिने मिस इंडिया, मिस टुरिझम, इंडियन प्रिंसेससह बरेच सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.
उर्वशी रौतेला चित्रपट, जाहीरात, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओ अशा विविध माध्यमांतून भरपूर कमाई करते. ती एका चित्रपटासाठी ३ कोटी तर एका म्युझिक व्हिडिओत काम करण्यासाठी ४० लाख रुपये मानधन घेते. उर्वशी आरामदायी लाईफस्टाईल जगते. तिच्या स्वत: ची जीम, थिएटरही आहे.
उर्वशीकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे. त्यात मर्सिडीज, रेंज रोवर एवोक, फेरारी पोर्टोफिनो, फेरारी 458 स्पाइडर, लेम्बोर्गिनी एवेंटाडोर, ऑडी क्यू 7 सह अनेक लक्झरियस गाड्या आहेत. त्या गाड्यांची किंमत सात कोटींहून अधिक आहे.