जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवताना कोकमचा आवर्जून वापर केला जातो. कोकमाच्या साली घेऊन त्यापासून आंबटगोड आमसूल बनवले जाते तर बियांचा वापर करून कोकम बटर तयार केले जाते. कोकमापासून तयार होणारे कोकम बटर जेवणात सुद्धा खाल्लेले जाते. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेले नैसर्गिक फॅटी अॅसिड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स कोरड्या त्वचेला मऊ आणि हायड्रेट करण्यास मदत करतात. त्यामुळे दैनंदिन वापरात आवर्जून कोकम बटरचा वापर करावा. कोकम बटरमध्ये असलेले विटामिन ई आणि ओमेगा-३ व ओमेगा-६ सारख्या आवश्यक फॅटी ॲसिडचे पॉलीअनसॅचुरेटेड फॅट्स त्वचा आतून मजबूत करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया कोकम बटर वापरण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – pinterest)
आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी पदार्थ! कोकम बटरच्या वापरामुळे त्वचेसह केसांना होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सविस्तर

कोकम बटरमध्ये असलेले मॉइश्चरायझिंग गुणधर्म कोरडी त्वचा मुलायम करण्यास मदत करतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये फाटलेल्या टाचांना कोकम बटर लावल्यास भेगा भरून निघतील.

शिया बटरच्या तुलनेत कोकम बटर अतिशय हलके असते. यामुळे त्वचेची छिद्र बंद न करता त्वचेत सहज शोषले जाते. त्यामुळे कोरड्या त्वचेवर कोकम बटर लावावे.

कोरडे ओठ, कोपर, गुडघे आणि टाचांवर नियमितपणे कोकम बटर लावल्यास फाटलेल्या भेगा आणि त्वचा भरून निघण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेला सुद्धा फायदे होतील.

ज्यांची त्वचा खूप जास्त तेलकट आहे, अशांनी कोकम बटर किंवा कोकम तेलाचा वापर अतिशय जपून करावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मोठ्या मोठ्या फोड्या किंवा पिंपल्स येऊ शकतात.

आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानावर आधारित असलेले कोकम बटर त्वचा आतून हायड्रेट करण्यास मदत करते. पूर्वीच्या काळी स्किन केअरमध्ये कोकम बटरचा वापर केला जायचा.






