वशीकरण ही एक दिव्या काळी जादू आहे. काही याला सत्य मानतात तर काही अंधविश्वास! पण हा खूप भयानक प्रकार मानला जातो. एखादा व्यक्ती आपल्या वशमध्ये आला तर त्याच्याकडून आपण काहीही करवून घेऊ शकतो. तो व्यक्ती आपला गुलाम होऊन जातो. असेच काही चित्र 'वश लेव्हल २' या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
'वश लेव्हल २' गुजराती चित्रपट मराठी रिव्हिव्ह. (फोटो सौजन्य - Social Media)

कृष्णदेव याग्निक यांनी 'वश लेव्हल २' या चित्रपटाचे लेखन तसेच दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट गुजराती भाषेत असून नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीला शाळेतल्या मुली कुणाच्या तरी वशमध्ये जातात आणि हे इतके भयंकर होते की त्या सगळ्या मुली शाळेच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन वरून उडी मारून आत्महत्या करतात.

एक वशीकरण करणारा राक्षस त्यांच्या मोठ्या भावाच्या शोधात असतो, जो स्वतः एक वशीकरण मास्तर असतो. त्याने या चित्रपटाच्या मुख्य पात्राच्या मुलीला १२ वर्षांगोदर वश केले असते.

त्यामुळे त्याने त्या मोठ्या राक्षसाला १२ वर्षांपासून त्याच्या घरी डांबून ठेवले असते. पण त्या गुरूच्या शोधात असणारा नवा राक्षस त्या शाळेतील मुलींचा वापर करून संपूर्ण शहरात थमासन घडवून आणतो.

फक्त १० रुपयांसाठी त्या राक्षसाने त्या मुलीला १२ वर्षांसाठी वशीकरणात कैद केले असते. त्या दोघांना कशी अद्दल घडवली जाते? ते पहाच.






