सर्वच महिला लग्नसमारंभात किंवा सणावाराच्या दिवसांमध्ये गळ्यात सोन्याचा नेकलेस घालतात . सोन्याचा नेकलेस घातल्यानंतर गळा उठावदार आणि सुंदर दिसतो. गळ्यामध्ये नेकलेस घातल्यानंतर गळा भरलेला दिसतो. नेकलेस घातल्यानंतर इतर कोणताही दागिना घालण्याची आवश्यकता भासत नाही. साडी, ड्रेस किंवा इतर ट्रेडीशनल कपड्यांवर तुम्ही सोन्याचा नेकलेस घालू शकता. आज आम्ही तुम्हाला १५ ते २० ग्रम मध्ये सोन्याच्या काही सुंदर नेकलेसची डिझाईन सांगणार आहोत. या डिझाइन्सचे नेकलेस नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-pinetrest)
नेकल्सच्या सुंदर डिझाइन्स
इतरांपेक्षा तुम्हाला सुद्धा थोडी युनिक डिझाईन हवी असेल तर तुम्ही या पद्धतीचे चोकर बनवून घेऊ शकता. चोकर गळ्यात खूप सुंदर दिसतात.
पानांचा आकार असलेले चोकर गळ्यात घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. लग्नात घालण्यासाठी तुम्ही या पद्धतीचे चोकर अगदी उत्तम डिझाईन आहे.
तुम्हाला जर जास्त हेवी नेकलेस परिधान करायला आवडत नसेल तर तुम्ही या डिझाईनचे नाजूक साजूक नेकलेस सोन्यामध्ये बनवून घेऊ शकता.
काठापदराची किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर या डिझाईनचा नेकलेस गळ्यात उठून दिसेल. गळा भरलेला वाटेल. इतर कोणतेही दागिने घालण्याची आवशक्यता भासणार नाही.
साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये या पद्धतीचे शॉर्ट नेकलेस गळ्यात खूप सुंदर दिसतात. तुम्ही या पद्धतीचा नेकलेस साडीसह ड्रेसवर सुद्धा परिधान करू शकता.