Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
26 Jan 2026 11:12 AM (IST)
“लाफ्टर शेफ सीझन ३” या कुकिंग कॉमेडी शोचा शेवटचा सामना २५ जानेवारी रोजी टीम काटा आणि टीम छुरी यांच्यात झाला. दोन्ही संघ त्यांचे १००% योगदान देताना दिसते. तसेच, अली गोनीच्या टीमने (जन्नत झुबैर, समर्थ जुरेल, अभिषेक कुमार, कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह) टीम छुरी (करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी, विवियन दसेना, ईशा सिंग, एल्विश यादव आणि ईशा मालवीय) वर विजय मिळवला आणि स्पर्धा जिंकली. या सहा स्पर्धकांनी आठ स्पर्धकांना पराभूत करून ट्रॉफी जिंकली.
26 Jan 2026 11:02 AM (IST)
लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात थरारक हत्या करून पसार झालेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लातुरात गस्त घालणाऱ्या ‘चार्ली’ पथकाच्या सतर्कतेमुळे हा उलगडा झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा १ वाजेपर्यंत सुरु होती.
26 Jan 2026 10:02 AM (IST)
भारतीय हवामान विभागाने (IMD) २६ जानेवारी २०२६ रोजी ११ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये २५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये दाट धुके आणि जोरदार बर्फाळ वारे येतील.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील बहुतांश भागात हवामान बिघडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत ११ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे होण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि केरळ यांचा समावेश आहे.
हवामान तज्ञांचा अंदाज आहे की २६ आणि २७ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात केवळ मुसळधार पाऊसच नाही तर ५० ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे आणि विजांच्या कडकडाटासह विनाशकारी गडगडाटी वादळे देखील येतील. याशिवाय, २८ जानेवारी रोजी बिहारच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, जिथे वाऱ्याचा वेग ताशी ४० किमी पर्यंत पोहोचू शकतो.
26 Jan 2026 09:55 AM (IST)
India US Trade Deal : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. भारत आणि अमेरिकेतील व्यापार पुन्हा रखडला गेला आहे. दोन्ही देशांतील व्यापार करारावर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप हा करार प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. नुकत्याच एक ताज्या माहितीनुसार, याबाबत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि सल्लागार पीटर नवारो यांच्यामुळे हा व्यापार करार रखडला असल्याचे समोर आले आहे. या संबंधित रिपब्लिकन सीनेटर टेड क्रूझ यांच्या लीक झालेल्या ऑडिओमुळे हा मोठा खुलासा झाला आहे. सध्या अमेरिकेच्या व्हाइट हाइसमध्ये भारत-अमेरिका (America) व्यापार करारावरुन अंतर्गत वाद सुरु आहे.
26 Jan 2026 09:40 AM (IST)
मुंबई: कोटक सिक्युरिटीजमधील एका तांत्रिक बिघाडामुळे (Technical Glitch) गजानन राजगुरु नावाचा ट्रेडर रातोरात कोट्यधीश बनल्याची रंजक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ट्रेडरला तात्पुरता मोठा दिलासा दिला आहे.
२०२२ मध्ये कोटक सिक्युरिटीजच्या सॉफ्टवेअरमधील दोषामुळे राजगुरु यांच्या खात्यात ४० कोटी रुपयांचा 'मार्जिन मनी' जमा झाला.या रकमेचा वापर करून राजगुरु यांनी ट्रेडिंग केले आणि त्यातून १.७५ कोटी रुपयांचा नफा मिळवला. कंपनीने या व्यवहाराविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने सध्या हा १.७५ कोटींचा नफा ट्रेडरकडेच राहू देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला होणार असून, न्यायालय अंतिम निर्णय काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
26 Jan 2026 09:35 AM (IST)
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेत वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ९ बाद १५३ धावा केल्या. भारताने अवघ्या १० षटकांत २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. अभिषेक शर्माने केवळ १४ चेंडूत अर्धशतक ठोकले, तर सूर्यकुमार यादवने सलग दुसरे अर्धशतक झळकावून विजयावर शिक्कामोर्तब केले.
26 Jan 2026 09:25 AM (IST)
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, या निर्णयावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान केला, अशा व्यक्तीचा भाजप सन्मान करत आहे, अशी टीका राऊत यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून केली आहे. "महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते, छान!" अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
26 Jan 2026 09:15 AM (IST)
मुंबई: भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी शंकरावर अत्यंत क्रूरपणे तब्बल 29 वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि झालेल्या अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
26 Jan 2026 09:10 AM (IST)
मुंबई: मुंबईत हक्काचे घर शोधणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडा दिलासादायक बातमी घेऊन येत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर, मार्च २०२६ मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे ३,००० घरांची लॉटरी काढली जाण्याची दाट शक्यता आहे.
26 Jan 2026 09:00 AM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यूजर्ससाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत आहे. या प्लॅन्सची किंमत कमी असते आणि यामध्ये बरेच फायदे ऑफर केले जातात. असाच एक प्लॅन कंपनीने पुन्हा एकदा लाँच केला आहे, ज्याची किंमत कमी आहे आणि प्लॅन्स बऱ्याच फायद्यांनी परिपूर्ण आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनबाबत सोशल मीडिया अकाऊंटवर देखील माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ अनलिमिटेड कॉलिंगच नाही तर कोणत्याही लिमीटशिवाय 100GB डेटा देखील दिला जात आहे.
26 Jan 2026 08:55 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 26 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,025 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,689 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,018 रुपये आहे. भारतात 26 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,46,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,60,250 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,20,180 रुपये आहे. भारतात 26 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 334.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 3,34,900 रुपये आहे
Former BCCI President Inderjit Singh Bindra passes away : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचे २५ जानेवारी रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच क्रिकेट जगत शोकाकुल झाले. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही शोक व्यक्त केला आणि सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.






