लग्न समारंभ किंवा पार्टीला जाताना सर्वच महिलांना सुंदर दिसायचं असतं. महिलांकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या डिझाईनचे सुंदर सुंदर कानातले असतात. तरीसुद्धा अनेकदा बाहेर कुठे जाताना नेमकं काय घालावं हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही मोतीचे कानातले घालू शकता. मोतीचे कानातले सर्वच कपड्यांवर खूप सुंदर आणि उठावदार दिसतात. पूर्वीच्या काळापासून महिला कानात मोत्याचे कानातले घालत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोती कानातल्यांच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य-pinterest)
लग्न समारंभात परिधान करा सुंदर मोती कानातले

काहींना कानामध्ये मोत्याची बाली घालायला खूप आवडते. मोत्याची बाली प्रामुख्याने नऊवारी साडी नेसल्यानंतर किंवा साडी नेसल्यानंतर घातली जाते. बाली कानातले तुम्ही कानामध्ये सुद्धा घालू शकता.

साडी नेसल्यानंतर किंवा ट्रेडिशनल ड्रेस घातल्यानंतर तुम्ही या पद्धतीचे मोती कानातले परिधान करू शकता. यामुळे तुमचे कान अधिक सुंदर आणि उठावदार दिसतील.

पैठणी किंवा काठपदर साडी नेसल्यानंतर या डिझाईनचे कानातले तुम्ही घालू शकता. मोत्याचे झुमके कानामध्ये खूप सुंदर दिसतात.

मोत्याच्या कानातल्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहते. त्यामध्ये तुम्ही छोट्या आकाराचे या पद्धतीचे कानातले रोजच्या वापरासाठी घेऊ शकता.

इंडोवेस्टन कपडे घातल्यानंतर हे मोत्याचे कानातले फार सुंदर आणि उठावदार दिसतील. मोत्याचे कानातले घातल्यानंतर कानाची शोभा वाढते.






