हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला हातामध्ये बांगड्या, ब्रेसलेट इत्यादी अनेक गोष्टी घालतात. सोन्याची किंमत महाग झाली असली तरीसुद्धा महिलांना गळ्यात किंवा हातामध्ये सोन्याचेच दागिने लागतात. ऑफिसला किंवा इतर वेळी बाहेर फिरायला जाताना अनेक मुली हातामध्ये ब्रेसलेट घालतात.ब्रेसलेट घालत्यानंतर हात खूप सुंदर दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला १ ते २ ग्रॅममध्ये सोन्याच्या ब्रेसलेटच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
हातांचे सौंदर्य खुलून 'या' डिझाईन्सचे सोन्याचे ब्रेसलेट

डायमंडचे दागिने घालायला सगळ्यांचं आवडतात. त्यामुळे तुम्ही या डिझाईनचे सुंदर ब्रेसलेट रोजच्या वापरासाठी बनवू शकता. तुमचे हात खूप सुंदर दिसतील.

तुम्हाला जर जास्त हेवी डिझाईनचे दागिने घालण्याची आवड असेल तर तुम्ही या डिझाईनचे ब्रेसलेट बनवू शकता. दोन चैनी एकत्र करून बनवलेले ब्रेसलेट हातामध्ये सुंदर दिसेल.

सणावाराच्या दिवसांमध्ये घालण्यासाठी तुम्हाला जर ब्रेसलेट हवं असेल तर ही डिझाईन अगदी योग्य आहे. या डिझाईनचे ब्रेसलेट तुम्ही सोनं आणि चांदीमध्ये बनवू शकता.

ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी पार्टीला जाताना तुम्ही या डिझाइन्सचे ब्रेसलेट हातामध्ये घालू शकता. नाजूक साजूक डिझाइन्स असलेले ब्रेसलेट हातामध्ये खूप सुंदर दिसतात.

काहींना डायमंडचे सुंदर कडे घालायला खूप आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनचे ब्रेसलेट किंवा डायमंडचा कडा घालू शकता.






