एप्रिल मे महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे लग्नाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असतात. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच तयारी आणि खरेदीला सुरुवात केली जाते. खरेदीमध्ये दागिने, लग्नातील साड्या, कपडे, चप्पल इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. साड्यांची खरेदी केल्यानंतर लग्नातील साडीवर नेमक्या कशा पद्धतीच्या चप्पल परिधान कराव्यात? असा प्रश्न सर्वच मुलींना पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्नातील साडी आणि लेहेंग्याला सूट होतील अशा काही चप्पलच्या सुंदर डिझाईन्स सांगणार आहोत. या डिझाईन्सच्या चप्पल नक्की ट्राय करून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्नातील लेहेंगा किंवा साडीवर परिधान करा 'या' स्टयलिश चप्पल
कोणत्याहीउ कपड्यांवर तुम्ही वेजेस हिल्स घालू शकता. हे हिल्स साडी, ड्रेस किंवा कोणत्याही कपड्यांवर सुंदर दिसतात. वेजेस हिल्स घातल्यानंतर तुम्हाला खूप आरामदायी वाटेल.
आपल्यातील अनेक स्त्रियांना जास्त हिल्स असलेल्या चप्पल घालायला खूप आवडतात. त्यामुळे साडी किंवा लेहेंग्यावर हिल्सच्या सँडल्स किंवा पेन्सिल हिल्सच्या चप्पल घालू शकता.
कोणत्याही कपड्यांवर घालण्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल आणि आरामदायी चप्पल म्हणजे कोल्हापूरी चप्पल. कोल्हापूरी चप्पल पायात परिधान केल्यानंतर पाय अधिक सुंदर दिसतात.
लग्नामध्ये साडी, लेहेंगा, पंजाबी सूट, धोती असे पारंपरिक कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही जूतिया घालू शकता. या चप्पल पायांची शोभा वाढवतील आणि अधिक सुंदर दिसतील.
फॅशनच्या युगात हल्ली अनेक मुली अतिशय आरामदायी वाटावे म्हणून लेहेंगा घातल्यानंतर शूज घालण्यास प्राधान्य देतात. शूजवर लेहेंग्याला मॅच होईल असे वर्क करून घेतले जाते.