नवरात्री उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पहिली जाते. यंदाच्या वर्षी नवरात्री उत्सव २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय देवीच्या मंडपामध्ये गरबा, दांडिया खेळाला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नवरात्रीमध्ये गरबा खेळायला खूप जास्त आवडतो. गरबा खेळायला जाताना लेहेंगा चोळी घालून त्यावर सुंदर सुंदर दागिने घातले जातात.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑक्सिडाईज नेकलेसच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाईन नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्री उत्सवात लेहेंग्यावर घ्या 'या' डिझाईनचे ऑक्सिडाईज नेकलेस, लेटेस्ट पॅटर्न दागिने अंगावर दिसतील शोभून
बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे सुंदर सुंदर दागिने उपलब्ध झाले आहेत. ऑक्सिडाईज दागिने नवरात्रीमधील लेहेंग्यावर खूप जास्त सुंदर दिसतात. या डिझाईनचा सुंदर नेकलेस तुमच्या गळ्याची शोभा वाढवेल.
काहींना अतिशय नाजूक दागिने खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही बारीक चैनीमधील फुलांचा सुंदर नेकलेस साडी किंवा लेहेंग्यावर घालू शकता.
चारचौघांमध्ये अतिशय सुंदर आणि उठावदार लुक हवा असेल तर तुम्ही या डिझाईनचा नेकलेस घालू शकता. हा नेकलेस नवरात्रीच्या सर्वच कपड्यांवर सुंदर दिसेल.
दांडियाच्या दिवसांमध्ये ऑक्सिडाईज दागिन्यांना मोठी मागणी असते. या डिझाईनचे दागिने लेहेंग्यावरच सुंदर दिसतात.
निळ्या रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या टॉपवर तुम्ही या डिझाईनचे नेकलेस घालू शकता. या नेकलेसमध्ये तुमचा गळा भरलेला दिसेल.