हिंदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. सौभाग्याचा दागिना म्हणून मंगळसूत्र ओळखळले जाते. नवविवाहित स्त्रीच्या गळ्यात लग्नाच्या वेळी मंगळसूत्र घातले जाते. रोजच्या वापारासाठी मुली नाजूक साजूक डिझाईनचे मंगळसूत्र परिधान करतात. कारण नाजूक डिझाईन कोणतीही साडी, ड्रेस किंवा इतर कपड्यांवर अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरात आणि ऑफिसमध्ये घालण्यासाठी काही सुंदर डिझाईन्सच्या मंगळसूत्रांची डिझाईन सांगणार आहोत. या डिझाइन्सचे मंगळसूत्र गळ्यात अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
रोजच्या वापरात परिधान करा 'या' आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र
लग्नात प्रामुख्याने वाटी मंगळसूत्र घातले जाते. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत वाटी मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये तुम्ही या डिझाईनचे मंगळसूत्र परिधान करू शकता.
हल्ली दागिन्यांच्या दुकानात रोज गोल्डचे सुंदर दागिने उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही या नाजूक साजूक डिझाईनचे आकर्षक मंगळसूत्र खरेदी करू शकता.
तुम्हाला जर मिनिमल आणि मॉर्डन लूक हवा असेल तर तुम्ही या डिझाईनच्या मंगळसूत्राची निवड करू शकता. हे मंगळसूत्र जीन्स किंवा वन पीसवर सुद्धा सुंदर दिसेल.
बदलत्या फॅशनमुळे मुली गळ्यात हल्ली काळे मणी असलेले नाजूक मंगळसूत्र परिधान करतात. सहा किंवा त्यापेक्षा जास्त काळे मणी असलेले मंगळसूत्र गळ्यात अतिशय सुंदर दिसते.
मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांमध्ये या प्रकारचे डायमंड किंवा इतर नाजूक डिझाईनचे लटकन तुम्ही लावून घेऊ शकता. सोशल मीडियावर या मंगळसूत्राची मोठी क्रेझ आहे.