आजच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतात. प्रत्येकाच्या फोनमध्ये आज तुम्हाला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पाहायला मिळतील. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे. पण सोशल मीडिया खरंच फायद्याचा आहे का? सोशल मीडियाचे इतके मोठ्या प्रमाणात युजर्स का आहेत? आता आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या काही हटके फायद्यांबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
 
        Tech Tips: सोशल मीडियाचे असेही आहेत फायदे, वाचून तुम्हीही व्हाल हैराण! जाणून घ्या

सोशल मीडियामुळे जगभरातील अंतर कमी झाले आहे. म्हणजेच तुम्ही अगदी दुसऱ्या देशातील लोकांसोबत देखील सहजपणे कनेक्ट करू शकता. तुम्ही अगदी काही क्षणातच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधू शकता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला झटपट बातम्या मिळतात. कोणतीही घटना घडल्यास सोशल मीडियावर सर्वप्रथम याबाबत अपडेट मिळते.

बिझनेस आणि ब्रँड प्रमोशनसाठी सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम मानले जाते. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरून जाहिरात करून तुमच्या बिझनेस आणि ब्रँडचे प्रमोशन करू शकता.

सोशल मीडिया अनेकांसाठी टॅलेंट आणि क्रिएटिविटी दाखवण्याचं एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलं आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे कौशल्य जगासमोर सादर करू शकता.

शिक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जातो. अनेक शैक्षणिक, हेल्थ आणि अवेअरनेस कॅम्पेन सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचतात.






