जेव्हा भलामोठा चित्रपट पाहण्याची इच्छा होत नाही तेव्हा कमी वेळेच्या शाॅर्ट फिल्म्स आपल्यासाठी परफेक्ट पर्याय ठरतात. बहुतेक तरुणांना आजकाल नेहमीच्या रोमँटिक कथा नाही तर सस्पेन्स थ्रिलरने भरलेल्या कथा पाहायला अधिक आवडते. या कथा शेवटपर्यंत प्रक्षकांना कथेतील रहस्य उलगडू देत नाहीत ज्यामुळे ते कथेच्या शेवटर्यंत त्याच्या मनात कथेला जाणून घेण्याती जज्ञासा कायम राहते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शाॅर्ट फिल्मविषयी सांगणार आहोत, ज्याची कथा तुमचे मनोरंजन तर करेलच शिवाय तुमच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण करेल. या शाॅर्ट फिल्मच नाव आहे 'चटणी'! चला या कथेत नक्की काय दडवण्यात आलं आहे ते जाणून घेऊया.
 
        नवरा, बायको, शेजारी आणि चटणी... रहस्यमयी कथा जिथे संसार वाचवण्यासाठी गृहिणी रचते कट; तुम्ही पाहिली आहे का ही 'शॉर्ट फिल्म'

२०१६ साली रिलीज झालेली 'चटणी' ही एक शाॅर्ट फिल्म आहे, ज्यात फार मोठे कलाकार नव्हते पण तरीही याच्या कथेने लोकांची मने जिंकली. ही फिल्म मनात अनेक प्रश्न निर्माण करते ज्याचं उत्तर तुम्हालाच शोधायचं आहे

रहस्य आणि गुन्हेगारीने भरलेल्या या शाॅर्ट फिल्ममध्ये काही प्रमुख भूमिका दाखवण्यात आल्या आहेत ज्यात पती, पत्नी, शेजारीण आणि नात्यातील गुंफण दाखवण्यात आली आहे

कथेची सुरुवात एका पार्टीने होते जिथे अनेक कुटुंबिय एकत्रित झालेले असतात. इथेच बनिता जी एक सामान्य गृहीणी आहे, तिला आपल्या पतीचे रसिका नावाच्या शेजारनीसोबत प्रमसंबंध असल्याचे उघडे होते. मात्र ही गोष्ट ती इतर कुणालाही कळू देत नाही

पती आणि शेजारणीमध्ये वाढत चाललेली जवळीक पाहून ती शांतपणे रसिकाला आपल्या घरी आमंत्रित करते. रसिका बनिताच्या चटणीची पार्टात फार प्रशंसा करते जे ध्यानात घेऊन बनिता तिला पकोडे आणि पुदिना चटणी सर्व्ह करते

शेजारणींमध्ये रगंलेल्या गप्पागोष्टींमध्ये बनिता जाणीवपूर्वक रसिकाला तिच्या घरातील गुन्हेगारीचे रहस्य हळूवारपणे उलगडत जाते जे ऐकूण रसिका स्तब्ध होते. आपला संसार वाचवण्यासाठी बनिताने केलेला हा प्रयत्न रसिकाच्या प्रतिक्रियेने यशस्वी झाल्याची पोचपावती मिळते. तुम्हाला ही शाॅर्ट फिल्म आजही यूट्यूबवर उपलब्ध मिळेल






