        तालिबानची पाकिस्तानला इशारा (फोटो- सोशल मीडिया)
अफगानिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले 
पाकिस्तानने केला होता आपल्याच लोकांवर हल्ला 
तालिबानने दिली पाकिस्तानला थेट इशारा
Afghanistan Vs Pakistan: गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले असल्याचे समोर येत आहे. सीमा वाद आणि दहशतवादाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. काबूलशी संबंध सुधारले असले तरी अफगाणिस्तानची भूमी फितना-अल-खवारीज आणि फितना-अल-हिंदुस्तान सारख्या दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केला आहे. यावार आता तालिबानने देखील भाष्य केले आहे.
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे. काही दिवस आधी पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर हल्ला केला होता. ज्यात अनेक नागरिक ठार देखील झाले होते.
तालिबानचा पाकिस्तानला इशारा
असीम मुनीर यांच्या विधानाचा अफगानिस्तानने चांगलाच समाचार घेतला आहे. तेथील तालिबान सरकारने पाकिस्तानला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि एक प्रमुख तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानला खडसावले आहे. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. जर हल्ला झाला तर आमचे उत्तर अत्यंत विनाशकारी असेल, असा इशारा तालिबान सरकारने पाकिस्तानला दिला आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. चार दिवसांच्या इस्तंबूल शांतता चर्चेत कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर तालिबानचा पूर्णपणे नाश केला जाईल आणि त्यांना पुन्हा गुहांमध्ये लपण्यास भाग पाडले जाईल.

इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शांतता चर्चेचे चार दिवस पार पडले, मात्र यात काहीही निष्पन्न झाले नाही. पाकिस्तानची मुख्य मागणी होती की, अफगाण तालिबानने पाकिस्तानमध्ये दहशत पसरवण्यासाठी अफगाण भूमीचा वापर करणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाई करावी. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “पाकिस्तानने बंधू देशांच्या विनंतीवरून संवादाची संधी दिली, परंतु अफगाण अधिकाऱ्यांच्या विषारी विधानांवरून त्यांची दुभंगलेली आणि कपटी वृत्ती दिसून येते.”