२६ ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी सगळीकडे दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्यामुळे या दिवसाची सगळे लोक आतुरतेने वाट पाहत असतात. जन्माष्टमीच्या दिवशी लाडक्या बाळगोपाळाला सजवून नैवेद्य दाखवला जातो. तसेच अनेक महिला उपवास सुद्धा करतात. श्री कृष्णाला नैवेद्यामध्ये दही आणि दुधापासून बनवलेले पदार्थ दाखवले जातात. कारण कृष्णाला दही दूध खूप आवडते, अशी मान्यता आहे. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी ५६ भोग दाखवले जातात. हे भोग दाखल्यामुळे घरात सुख समाधान आणि शांतता नांदते. (फोटो सौजन्य-istock)
जन्माष्टमीची पूजा करताना कृष्णाला अर्पण करा 'हे' पदार्थ
श्री कृष्णाला माखन, दही, दूध, लोणी हे पदार्थ खूप आवडतात. कृष्णाला माखन अर्पण केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात,मी असे मानले जाते.
नैवेद्यासाठी मखणा खीर बनवली जाते. तसेच जन्माष्टमीला खीर अर्पण केल्यामुळे संततीचे आशीर्वाद लाभतो आणि लक्ष्मी माता नेहमी आपल्यावर प्रसन्न राहते.
कृष्णाची पूजा करताना कृष्णाला काकडीचा भोग चढवणे आवश्यक असते. कारण काकडी कापून लाडू गोपाळांचा जन्म झाला होता.
जन्माष्टमीच्या कृष्णाला पंचामृताचा अभिषेक केला जातो. यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर इत्यादी पदार्थ वापरून पंचामृत बनवले जाते. यामुळे कुटुंबात कायम गोडवा आणि प्रेम टिकून राहते.
श्री कृष्णाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पिंजरी. जन्माष्टमीच्या दिवशी सर्वच घरांमध्ये पिंजरी हा पदार्थ बनवून कृष्णाला अर्पण केला जातो.