राज्यासह संपूर्ण देशभरात उन्हाचा पारा वाढला आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर थकल्यासारखे वाटते. घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून गेल्यानंतर खूप जास्त अशक्तपणा येतो तर काहीवेळा चक्कर येण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यायले जाते. पण बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडतो की लिंबू पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे की नारळ पाणी गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
कडक उन्हाळ्यात कोणते पेय आहे शरीरासाठी सगळ्यात उत्तम, लिंबू पाणी की नारळ पाणी...

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि आतड्या स्वच्छ होतात. याशिवाय संपूर्ण बॉडी डिटॉक्स करण्यासाठी नेहमी लिंबू पाण्याचे सेवन करावे.

लिंबू पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्सचा उत्तम स्त्रोत आहे. एक नारळ पाणी एका सलाईन एवढे फायदेशीर ठरते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाण्याचे सेवन करावे.

शरीरातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर लिंबू पाणी प्यावे आणि शरीरात थकवा, अशक्तपणा वाढला असेल तर नारळ पाणी प्यावे.






