आपल्या पृथ्वीवर असे अनेक सजीव जीव आहेत ज्यांची वैशिष्ट्ये जाणून आश्चर्य वाटते. प्रत्येक प्राण्याचे एक खास असे वैशिष्ट्य असते. त्यातीलच एक म्हणजे सरडा. होय, तोच सरडा जो रंग बदलतो. तुम्ही असे रंग बदलणारे सरडे पाहिले देखील असतील. पण तुम्हाल कधी प्रश्न पडला आहे की, हे सरडे रंग कसे आणि का बदलतात. नसेल माहिती तर हा लेख तुमच्यासाठी आज आपण सरडा का आणि कसा रंग बदलतो याचे अद्भुत रहस्य जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: iStock)
Chameleon

जसे मानवाला चालता-बोलता, वाचता-लिहिता, खाता-पिता येते त्याची वेगळी वैशिष्ट्ये असतात. तशीच प्राण्यांकडे देखील खास वैशिष्ट्ये असते. यामध्ये सरड्याला एका खास गिफ्ट मिळालेले आहे, ते म्हणजे रंग बदलण्याचे

असे म्हणतात सरडा शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी, त्याच्या सुरक्षेनुसार रंग बदलतो. तसेत शिकाऱ्याला जाळ्यात ओढताना देखील रंग बदलतो.

तुम्ही सरड्याला पानांच्या रंगाप्रमाणे, दगडाप्रमाणे आपला रंग बदलताना किंवा आणखी कोणत्या वेगळ्या रंगात बदलताना पाहिले असेल

शास्त्रज्ञांच्या एका रिसर्चनुसार सरडा, त्याच्या भावानानुसार रंग बदलतो. म्हणजे त्याला राग, आक्रमकता आणि दुसऱ्या सरड्यांना त्याचा मूड दाखवण्यासाठी रंग बदलतात

काही सरडे तर रंगासोबत आपल्या शरीरिचा आकारही बदली शकता. यामध्ये मोठा आणि लहान गरज पडेल तसा आकार सरड्यांना करता येतो

शास्त्रज्ञांच्या रिपोर्टनुसार सरड्याच्या शरिरामध्ये फोटोनिक क्रिस्टल नावाचा एक थर असतो, ज्यामुळे सरड्यांना वातावरणानुसार रंग बदलता येतो

हा फोटोनिक क्रिस्टल थर प्रकाशाच्या परावर्तनाला प्रभाविक करतो आणि यामुळे सरड्याचा रगं बदलले दिसतो

सरडा लाल, पिवळा, निळा जांभळ्या अशा अनेक वेगवेगळ्या रंगामध्ये बदलू शकतो






