जगभरात दरवर्षी ७ जुलैला जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी चॉकलेट दिले जाते. नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढवण्यासाठी जोडीदाराला चॉकलेट गिफ्ट केले जाते. तसेच चॉकलेट खाल्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला जागतिक चॉकलेट दिन आणखीनच खास आणि स्पेशल होण्यासाठी जोडीदारासाठी चॉकलेटपासून कोणते पदार्थ बनवावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडतील. (फोटो सौजन्य – istock)
जागतिक चॉकलेट दिन होईल आणखीनच स्पेशल! जोडीदारासाठी चॉकलेटपासून बनवा 'हे' स्पेशल पदार्थ

जागतिक चॉकलेट दिन आणखीनच स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही घरी चॉकलेट ब्राउनी बनवू शकता. मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, साखर आणि चॉकलेटपासून बनवला जाणारा पदार्थ तुमच्या जोडीदाराला खूप जास्त आवडेल.

सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. त्यामुळे तुम्ही घरी चॉकलेट पिझ्झा बनवू शकता. चॉकलेट सॉस, स्ट्रॉबेरी आणि ड्रायफ्रूट टॉपिंग्ज, फळांचा वापर करून सुंदर पिझ्झा बनवू शकता.

बाजारात वेगवेगळ्या आकाराची चॉकलेट मिळतात. त्यामुळे ड्रायफ्रूट चॉकलेट, रेसिन्स चॉकलेट किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले चॉकलेट तुम्ही तुमच्या जोडीदाराला गिफ्ट म्हणून देऊ शकता.

वाढदिवस किंवा कोणत्या शुभ प्रसंगी घरात चॉकलेट केक आणला जातो. चॉकलेट ट्रफल्सकेक चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे जागतिक चॉकलेट दिन साजरा करण्यासाठी तुम्ही घरी चॉकलेट ट्रफल्स केक आणू शकता.

रोमँटिक डेटसाठी चॉकलेट पुडिंग उत्तम पर्याय आहे. क्रीम, आईस्क्रीम किंवा हॉट चॉकलेट सॉससोबत तुम्ही चॉकलेट पुडिंग सर्व्ह करू शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो.






