Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

Aaditya Thackeray On Sachin Ahir : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?' असा सवाल केला आहे,

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 02:54 PM
'आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?' आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

'आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?' आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • सचिन अहिरांच्या पक्षांतरानंतर आदित्य ठाकरे आक्रमक
  • ‘त्यांच्या घराला किती पदे दिली, ते मोजा’
  • सचिन अहिरांवर संतप्त प्रतिक्रिया
Aaditya Thackeray On Sachin Ahir News Marathi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही महायुतीच्या पाठिंब्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे आमदार आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत सचिन अहिर यांच्यावर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, “आता आम्ही सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?” असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, “अहिरांच्या घरातील सदस्यांना ठाकरे गटाने किती पदे आणि किती संधी दिल्या, याची मोजदाद केली पाहिजे,” असे म्हणत त्यांनी पक्षाने दिलेल्या राजकीय संधींची आठवण करून दिली. आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पक्षांतराच्या राजकारणावरही टीका केली. त्यांनी सांगितले की, शिवसेनेने अनेक नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना मोठी पदे दिली, मात्र सत्तेच्या आणि पदाच्या राजकारणामुळे काही जण पक्ष सोडत आहेत. अशा कृतीमुळे जनतेचा विश्वासघात होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

ऑपरेशन टायगर 3.0 ची मोठी शिकार! ‘सचिन अहिर यांनी आज षटकार मारला’; शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस

आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर थेट टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना पदे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मराठी पंतप्रधानांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या पदासाठी शिंदे गटाकडून इतर नावांची चर्चा होती. मात्र ऐनवेळी सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता विधान परिषदेतील महत्त्वाच्या चेहऱ्यानेही साथ सोडल्याने ठाकरे गटासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हाने अधिक वाढली आहेत. सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची ‘ही’ कारणे चर्चेत

Web Title: Aaditya thackeray reaction on sachin ahir joining shiv sena shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Eknath Shinde
  • Sachin Ahir
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
4

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.