Eknath Shinde Live : सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद
Eknath Shinde Live : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता आणखी मोठा राजकीय धक्का शिवसेना ठाकरे गटाला पोहोचला आहे. ‘ऑपरेशन टायगर 2.0′ च्या यशानंतर आता पुन्हा ‘ऑपरेशन टायगर 3.0′ सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकीय वर्तुळात हा मोठा धक्का मानला जात असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडत आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सचिन अहिर यांचा उल्लेख सचिन तेंडुलकर असा केला. ते म्हणाले, “सचिन अहिर यांनी आज षटकार मारला… याआधी सहा खासदारांनी षटकार मारले होते. चौकार षटकार सुरु आहे. एक एक विकेट पडत जाईल. हा क्रिकेटचा गमतीचा भाग जाऊ द्या. सचिन अहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार होते. आता विधान परिषदेचे आमदार आहेत. ते राज्यमंत्री होते. सात विभाग त्यांच्याकडे होते. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलंय. अनेक संघटनांमध्ये काम केलं. मूळ मुंबईकर भूमिपुत्रांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते आहेत.”






