Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो…’; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया देत आश्चर्य आणि खंत व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Jun 30, 2026 | 03:18 PM
'सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो...'; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

'सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो...'; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता आणखी एक मोठा राजकीय धक्का ठाकरे गटाला बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीनंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

सचिन अहिर यांच्या पक्षांतराबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “सचिन अहिर आणि मी काल रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो. आम्ही एकत्रच निघालो होतो. पण सकाळी त्यांनी असा निर्णय घेतला. त्यावर आता काय बोलणार?” त्यांच्या या वक्तव्यातून अहिरांच्या निर्णयामुळे त्यांना बसलेला धक्का आणि आश्चर्य स्पष्टपणे जाणवत होते.

‘वरळीत कोणतंही आव्हान निर्माण होणार नाही’

अहिरांच्या पक्षांतरामुळे वरळी मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार का, असा प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की, “विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही अर्ज भरला आहे. निवडणुकीचं चित्र उद्या स्पष्ट होईल. मात्र वरळीत कोणतंही आव्हान निर्माण होणार नाही. वरळी ही शिवसेनेचीच जागा आहे. यापूर्वी सुनील शिंदे यांनी सचिन अहिरांचा पराभव केला होता.”

ऑपरेशन टायगर 3.0 ची मोठी शिकार! ‘सचिन अहिर यांनी आज षटकार मारला’; शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

वैभव नाईक यांचीही स्पष्ट भूमिका

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही सचिन अहिर यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. “मला कोणतीही ऑफर आलेली नाही. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. जे एकनिष्ठ आहेत, ते शेवटपर्यंत एकनिष्ठच राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘आम्हालाही हा मोठा धक्का’

मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनीही अहिरांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्हालाही हा मोठा धक्का बसला आहे. आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. पक्षाने त्यांना आमदार केलं, त्यांच्यावर कधीही अन्याय केला नाही. तरी त्यांनी हा निर्णय का घेतला, हे आम्हालाही समजलेलं नाही.”

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

शिंदे गटात अधिकृत प्रवेश

मंगळवारी सकाळी सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Web Title: Ambadas danve first reaction after sachin ahir joins shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Maharashtra Politics
  • Sachin Ahir
  • shivsena

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.