Baramati Bypoll Election Exit Poll: बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? मतदानानंतर 'पोल पंडित'चा कौल महायुतीच्या बाजूने
Baramati Bypoll Election Exit Poll: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले असून, ‘पोल पंडित’ या संस्थेने आपला एक्झिट पोल (निकालाचा अंदाज) प्रसिद्ध केला आहे. या अंदाजानुसार, दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिल्याचे दिसत असून, सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात ३.३३.५४५ मतदारांपैकी ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजपचे अक्षय कर्डिले यांना ७० ते ७५ टक्के मते मिळण्याचा अंदाज असून, त्यांचे मताधिक्य ९५ हजार ते १ लाख ५ हजार दरम्यान राहू शकते. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती आणि भाजपचे मजबूत संघटन या जोरावर कर्डिले यांनी ही निवडणूक खेचून आणल्याचे चित्र आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात ३,८४,५७९ मतदारांपैकी ५८ टक्के मतदान झाले आहे.
मतदार, राजकीय पदाधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
हा केवळ निकालाचा अंदाज असून अंतिम आकडेवारी निकालानंतरच स्पष्ट होईल, असे ‘पोल पंडित’ संस्थेने स्पष्ट केले आहे.
राजकीय पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.






