Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण

KDMC Politics: ठाकुर्ली परिसरातील शेकडो शिंदे गटातील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले आहे. "भाजपची चाल कासवासारखी असली तरी एकाच्या बदल्यात चार घेणार," अशी प्रतिक्रिया देत भाजपने आगामी काळात आणखी मोठे राजकीय धक्के देण्याचे संकेत दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 11:15 AM
महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण

महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण

Follow Us
Follow Us:
  • ठाकुर्लीमधील शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
  • कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण
  • कल्याण-डोंबिवली कार्यक्षेत्रात शिवसेना-भाजप राजकीय युद्ध सुरूच
KDMC Politics: कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC Politics) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे काही पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

ठाकुर्ली परिसरातील शेकडो शिंदे (Shivsena ) गटातील शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

भाजपची चाल कासवासारखी…

या घडामोडीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना, “भाजपची चाल कासवासारखी असते, पण ती ठाम आणि दूरगामी असते. एकाच्या बदल्यात चार कार्यकर्ते आमच्याकडे येतील,” असा दावा केला. या विधानातून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचे संकेत देण्यात आले.

पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी

शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अर्चित खडकूल यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की, पक्षासाठी सातत्याने मेहनत घेऊनही त्यांना योग्य वेळी जबाबदारी किंवा पद देण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर, एका बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचाही आरोप त्यांनी केला.

खडकूल यांच्या म्हणण्यानुसार, पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नव्हती. एका बैठकीदरम्यान एका पदाधिकाऱ्याला सर्वांसमोर बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या घटनेमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. पक्षात सन्मान आणि कामाला योग्य न्याय मिळत नसल्याची भावना वाढत गेल्याने अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षांतराचे सत्र सुरू

गेल्या काही आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू असून, त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, KDMC निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी पक्षांतरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील आगामी महापालिका निवडणूक केवळ विरोधकांविरोधातील लढत न राहता, महायुतीतील अंतर्गत वर्चस्वाचीही परीक्षा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Bjp inducts hundreds of shinde shiv sainiks in thakurli kalyan dombivli political war intensifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • BJP
  • KDMC
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन
1

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा
2

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
3

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
4

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.