पहलगाम काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर नवनीत राणा यांची पाकिस्तानला धमकी (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या भ्याड हल्ल्यात 27 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. भारताकडून यानंतर कडक पाऊले उचलण्यात आली आहे. भारताकडून सिंधु जल देखील कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहेलगांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून 27 पर्यटकांना ठार केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात आली. तसेच तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील यावरुन आवाज उठवण्यात आला. आज (दि.25) अमरावतीमध्ये देखील राजापेठ चौकामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. ही श्रद्धांजली सभा भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानला धमकी दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवनीत राणा या सभेमध्ये म्हणाल्या की, पाकिस्तानचे आता सध्या फक्त पाणी बंद केलं आहे. येणाऱ्या काळात तुम्ही दाण्या दाण्याला तरसाल. तसेच एका खुनाचा बदला 10 ने घेऊ आणि दहा खुनांचा बदला हजारोंनी घेऊ. आम्ही पहिले ही भीत नव्हतो आणि आताही भीत नाही. तुम्ही फक्त भीती निर्माण करण्यासाठी भारतात आले. आम्ही तुम्हाला भीतीने खतम करायला पाकिस्तानात येऊ असे, म्हणत राणा यांनी पाकिस्तानला धमकावले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अनेक पाऊले उचलली आहेत. सिंधू जल करारला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केंद्र सरकारच्या प्रतिसादाचे समर्थन केले आहे. यावर त्यांनी म्हटले की, आता पाकिस्तानला कडक आणि निर्णायक उत्तर देण्याची वेळ आली आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आणि ते एक धाडसी पाऊल असल्याचे म्हटले. जर आपण पाकिस्तानला पाणी दिले नाही तर ते कुठे साठवणार असा प्रश्नही त्यांनी सरकारला विचारला.आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला स्वसंरक्षणार्थ हवाई आणि सागरी नाकेबंदी करण्याचा अधिकार आहे आणि भारतानेही शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर बंदीसारखे कठोर उपाय करावेत.अशी भूमिका असदुद्दीन ओवैसी यांनी घेतली आहे.