उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारत पाकिस्तान युद्धावर दिली प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
सिंधुदुर्ग : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 जण हे महाराष्ट्रामधील आहेत. या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीर दौरा केला. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देत त्यांनी परत आणले आहे. यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग दौरा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पहलगावमध्ये झालेला हा भ्याड हल्ला त्यावेळी सर्व पर्यटक हे भयभीत झाले होते. तिथे महाराष्ट्रमधील जे लोक होते ते फोन करत होते त्यामुळे मी तिथे गेलो होतो. भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. त्यांच्याशी बोलून ते दूर करण्याची गरज होती म्हणून मी स्वतः तिकडे गेलो. चार विशेष विमानांची व्यवस्था त्यांना आणण्यासाठी केली होती. त्या सगळ्या ग्रुपला महाराष्ट्रमध्ये आणण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे त्यांना आधार वाटला अशा लोकांना मॉरल सपोर्ट देणं ही आमची जबाबदारी आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिकवण आहे आनंद दिघे यांची शिकवण आहे. आपत्ती व आपदा संकट जेव्हा जेव्हा येते मग केरळ असेल, इरशाळवाडी असू देत कोल्हापुरातला पूर, अगदी उत्तराखंड त्या ठिकाणी मी गेलो, असे मत त्यांनी मांडले. त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अनुपस्थित होते. यावरुन शिंदे म्हणाले की, हेच ते राष्ट्रप्रेम आहे हेच काय ते महाराष्ट्र प्रेम आहे? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? पहेलगाम चा हल्ला कोणा व्यक्तीवर नाही देशावरचा हल्ला आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला चोख आणि जशास तसे उत्तर देण्याचे व खून का बदला खून से देण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विचारांच्या पलीकडे जाऊन पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. पाकिस्तानचे नामोनिशान मिटवण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह करतील, असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
RSS ची भूमिका काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील पहलगाम हल्ल्याबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मोहन भागवत म्हणाले की, जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानव धर्म. त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी किंवा आपल्याकडच्या लोकांनी कधी कुणाला धर्म विचारून लोकांना मारलेले नाही. काल कट्टरपंथीयांनी जो उत्पात केला, तसा हिंदू कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. त्यामुळेच आपला देश बलवान पाहिजे”, अशी भूमिका मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.