फोटो सौजन्य सोशल मिडिया
भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी या पत्रकारपरिषदेत आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली; या पत्रकारपरिषदेत भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही निवडणुकीत सहकार्य करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका भाजपने जाहीर केली आहे.
या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीदरम्यान भाजपच्या 04 पैकी 02 उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाले होते. त्यानंतर भाजपच्या जागांवर पर्यायी उमेदवारांच्या निवडीवरूनही वाद निर्माण झाला होता. शेवटी शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट ) 05 आणि भाजपचे 02 उमेदवार स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले गेले होते. या प्रक्रियेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तर हे प्रकरण न्यायालयात नेण्याची भूमिकाही जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे उल्हासनगर महापालिकेतील भाजप आणि शिवसेना यांच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट युतीच्या भवितव्यापर्यंत पोहोचला आहे. तर भाजप आणि शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे गट ) युती मध्ये फूट पटण्याची शक्याता दिसून येत आहे.भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उल्हासनगरच राजकारणात आता चर्चेत आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत पुढील काळात काय घडते आहे. या कडे सर्वांचे लक्ष आहे.






