
पश्चिम बंगालमध्ये या वर्षी होणार विधानसभा निवडणूक
तृणमूल कॉँग्रेस व भाजपमध्ये चुरशीची लढत
भाजपसाठी समजली जातेय महत्वाची निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये लवकरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षा अखेरीस किंवा वर्षाच्या मध्यात विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तृणमूल कॉँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होणार असे दिसून येत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार याचा अंदाज घेण्यात आला आहे.
दरम्यान सी-वोटर ने पश्चिम बंगालमध्ये एक सर्व्हे केला आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकू शकते याचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान आपण पाहिले आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नागरिकांचा कल वेगवेगळ्या असतो. मात्र सर्व्हे करून नागरिकांचा कल जाणून घेतला गेला आहे.
2024 ची स्थिती काय होती?
लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 29 जागा तृणमूल कॉँग्रेसने जिंकल्या होत्या. 2019 पेक्षा टीएमसीने जास्त जागा जिंकल्या. तर 2024 मध्ये भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. भाजप बंगालमधील दूसरा मोठा पक्ष ठरला होता.
सी-वोटर ने पश्चिम बंगालमध्ये एक सर्व्हे केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, आता पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक झाली तर टीएमसीचे प्रदर्शन 2024 प्रमाणेच राहू शकते. केवळ 1 जागेवर तृणमूल कॉँग्रेसचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच 29 पैकी 28 जागांवर त्यांचा विजय होऊ शकतो.
तसेच सर्वेक्षणानुसार भाजपला थोडा फायदा होताना दिसून येत आहे. त्यांच्या 2 जागा वधू शकतात. म्हणजेच भाजप 12 जागांवरून 14 जागांवर पोचू शकते. जानेवारी महिन्यात भाजपच्या मतदारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. 39 टक्के असलेले मतदारांचा आकडा आता 42 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक झाल्यास पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसची सत्ता येताना दिसत आहे.
Mangal Prabhat Lodha: “पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून…”; मंत्री लोढांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
ममता बॅनर्जींच्या विधानावर देवेंद्र फडणवीस संतापले
बारामती येथील विमान अपघातात अजित पवार यांच्या मृत्यूवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बॅनर्जी यांनी “राजकीय फायद्यासाठी एखाद्याच्या मृत्यूचा वापर” केल्याचा आरोप करत, फडणवीस यांनी त्यांचे विधान दुर्दैवी आणि निषेधार्ह म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली वाहण्याची आणि शोकाकुल कुटुंबासोबत उभे राहण्याची वेळ आहे.