"इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही, तुमचा आदर करतो, मात्र...; चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजपा आणि महायुतीची सत्ता आली. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शापथविधी सोहळा देखील पार पडला, मात्र अजूनही इव्हिएम मशीनबाबत महाविकास आघाडी आणि इतर विरोधक पक्षांची इव्हिएम मशीन मतमोजणीवर नाराजी कायम आहे. याच याचपार्श्वभूंमीवर महाविकास आघाडीतील, इतर पक्षातील तसेच अपक्ष पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएम मशीनच्या मतमोजणीवर ताशेरे ओढत आहेत. अशातच आता महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मतमोजणीसंबंधित मारकडवाडी ग्रामस्थांना भेट दिली असता महायुतीच्या चंद्रशेखर बावनकुळे .यांनी पवारांवर टीका केली आहे.
चंद्रशेखर बानकुळे म्हणाले की, तुमच्या अपयशाचं खापर इव्हिएमच्या मतमोजणीवर फोडू नका. राजकारण शरद पवरांचं मोठं नाव आहे. मी त्यांचा आदर आणि सन्मान करतो. मात्र त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करु नये, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, महाविकास आघाडीने त्यांचा पराभव स्विकाराला पाहिजे होता. इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही. मतमोजणीत घोटाळा आहे असं म्हणून शरद पवार आणि महाविकास आघाडी जनतेने जो कौल दिला आहे त्याला नाकारत आहे. महायुतीच्या विरोधात राज्यातील जनतेला भडकवण्याचा महाविकास आघडीचा केविलवाणा प्रय़त्न असल्याची खोचक टीका बानवकुळेंनी शरद पवार यांच्यावर केली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर दोष देऊन अपयश लापवण्याचे काम करत आहेत. मात्र, कितीही नौटंकी केली तरी महाराष्ट्र याला कंटाळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होईल हा जनतेला विश्वास आहे. मात्र मविआ संविधानाचा अपमान करत आहे असा हल्लाबोल देखील बावनकुळेंनी केला आहे.
विधानसभा निवडणूकीच्य़ा निकालावर नाराजी व्यक्त करत शरद पवार म्हणाले की, मतादानाच्या दिवसापर्यंत विधानसभा निवडणुकीत वातावरण अनुकूल होतं . मात्र निवडणुकीचा निकाल हा अविश्वसनीय होता. ईव्हीएम मतमोजणीची माझ्याकडे ठोस आकडेवारी नाही. त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय मी बोलणार नाही. परभवाचं दुख असलं तरी महायुतीकडे बहुमत आहे हे मान्य केलं पाहिजे. तसंच काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा देखील पराभव झालेला आहे. मात्र मारकडवाडीमध्ये बंदी घालण्याचं कारण काय? त्या गावातील लोकांना पहायचं होतं की मतं कुणाला किती पडली. आणि हे जाणून घेणं त्यांचा हक्क आहे. म्हणूनच गावकऱ्यांचं म्हणणं आणि त्यांची भुमिका जाणून घेण्य़ासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.