Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

महाराष्ट्रातील हजारो लोक हे दुबईमध्ये अडतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये माहिती दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 04, 2026 | 03:47 PM
CM Fadnavis informed on Efforts underway to rescue tourists from Maharashtra in Dubai in the legal council

CM Fadnavis informed on Efforts underway to rescue tourists from Maharashtra in Dubai in the legal council

Follow Us
Follow Us:
  • आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळामध्ये माहिती
  • हेल्पलाईन नंबर आणि प्रत्यक्ष संवाद साधला
मुंबई : मध्यपूर्व भागांमध्ये युद्धपरिस्थिती निर्माण झाली असून यामुळे अनेक भारतीय हे दुबई आणि इतर देशांमध्ये अडकले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पर्यटकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील हजारो लोक हे दुबईमध्ये (Dubai News) अडतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांबाबत माहिती दिली आहे. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत या ठिकाणी मागच्या काही दिवसात इराणने हल्ले केले आहेत. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय अडकले आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले की, “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरु केले आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना

पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांना माहिती आहे की एअर इंडियाची विमानं हळूहळू त्या ठिकाणी जाऊन लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरु आहेत. जिथून आणणं शक्य आहे, तिथून आपण लोकांना आणत आहोत. कुवैतमध्ये समस्या आलेली, काही ट्रान्झिट पॅसेंजर आहेत. त्यांच्या व्हिसाच्या अडचणी होत्या. एम्बीसने प्रयत्न करुन त्यांना एका ठिकाणी थांबवलेलं आहे. त्यांना अडचण येणार नाही असा प्रयत्न आपल्यावतीने करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळामध्ये दिली आहे.

हे देखील वाचा : केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत

“परदेशात जिथे-जिथे आपली मराठी मंडळं आहेत, ती सक्रीय करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत, त्यांना मदत करतोय. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गिरीश महाजन त्यांच्याशी बोलले आहेत. आपले चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांना ही जबाबदारी दिली आहे. कारण ते फॉरेन सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी एंबसीची बैठक घेतली. ज्या एसओपी आहेत, त्या नागरिकांना दिल्या आहेत. लोकांनी काय काय करायचं आणि काय करु नये हे पोहोचवलं आहे. हेल्पलाईनच्या माध्यमातून जी मदत करणं शक्य आहे ती करत आहोत. मिहिर कोटेचा यांनी दुबईत अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.,” असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Web Title: Cm fadnavis informed on efforts underway to rescue tourists from maharashtra in dubai in the legal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Dubai
  • Iran Israel Conflict

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
2

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
3

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
4

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.