Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: नाशिक निवडणुकीत तिरंगी ट्विस्ट! दराडे-गीते-हिरे आमनेसामने, बिनविरोधचा प्लॅन फेल

नाशिक विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अखेर निष्फळ ठरला असून नरेंद्र दराडे, गीते आणि हिरे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. भाजपाचे बंडखोर गणेश गीतेंनी अखेर नाट्यमय माघार घेतली असली, तरी राजकीय घडामोडींनी निवडणुकीत रंगत वाढली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 11:49 AM
नाशिक निवडणुकीत तिरंगी ट्विस्ट! दराडे-गीते-हिरे आमनेसामने, बिनविरोधचा प्लॅन फेल

नाशिक निवडणुकीत तिरंगी ट्विस्ट! दराडे-गीते-हिरे आमनेसामने, बिनविरोधचा प्लॅन फेल

Follow Us
Follow Us:
  • दराडे-गीते-हिरेंमध्ये होणार तिरंगी लढत
  • बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न निष्फळ
  • भाजपाचे बंडखोर गणेश गीतेंची नाट्यमय माघार
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून निर्णायक वळणावर येवून ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीतून गिते बंधूनी माघार घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी प्रयत्न केल्याने अंतीम क्षणी भाजपाचे गणेश गिते यांनी माघार घेत शिंदे सेनेला काहीसा दिलासा दिला असला तरी, गिते यांचे बंधू व भाजप समर्थक अपक्ष गोकूळ गिते यांनी भावनिक मुद्दा उपस्थित करून माघार घेण्यास नकार दिला. त्याच वेळी भाजपाचे दुसरे समर्थक मालेगावचे प्रसाद हिरे यांनीही आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे यंदा पहिल्यांदाच विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होणार आहे.

Karnataka Politics : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांचा मार्ग खडतरच; ‘या’ आव्हानांना द्यावे लागणार तोंड

तीन उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणूकीची चुरस वाढली असून, शिंदे सेनेकडून बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. माघारीच्या दिवशी सकाळपासूनच सर्वांची उत्सूकता ताणली गेली होती. दहा वाजेपासूनच शिंदे सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता उपमहापौर विलास शिंदे यांनी राष्ट्रवादीचे गोरख बोडके व विष्णुपंत म्हैसधुणे यांना सोबत घेवून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या दोघांनीही एका पाठोपाठ माघार घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर हे देखील उपस्थित होते. दोघांनी माघार घेतल्यानंतर म्हैसधुणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना काल मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांनी आपल्याशी चर्चा करून युतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले तसेच सुनील तटकरे यांनी देखील समजूत काढली. युतीचा धर्म पाळण्याचे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केल्यामुळे आपण माघार घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र निवडणूक रिंगणातील अपक्ष परवेज कोकणी, कुणाल दराडे, इस्लाम पार्टीचे मोहम्मद रशीद यांनीही माघार घेतली.

मंत्री भूसेंकडून गितेंची समजूत

या निवडणूकीतील प्रबळ दावेदार गणेश गिते यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री, कुकुंभमेळामंत्री यांच्याशी चर्चा करून उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शविली असली तरी, ते माघार घेणार काय या विषयीची उत्सूकता ताणली गेली होती.

गिते सकाळी नाशकात परतले, परंतु त्यांचे बंधू गोकूळ गिते है नॉट रिचेबल होते, त्याच वेळी हॉटेल ट्रीटमध्ये मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व गणेश गिते यांची बैठक होवून त्यात दोन्ही बंधुंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.

गणेश गिते यांनी युतीचा धर्म पाळून माघार घेण्याचे कबुल केले तथापि, या निवडणूकीत आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली. त्यानंतर गिते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांनी २ वाजून ४० मिनीटांनी माधार घेतली. यावेळी महाजन समर्थक निलेश बोरा हे देखील त्यांच्या समवेत होते, बोरा यांनी अर्ज नेला परंतु त्यांनी अर्ज दाखल केला नाही.

भाजपमधील नाराजी, जुने राजकीय ऋणानुबंध आणि मतांची गणिते; वसंत देशमुखांच्या श्रीपूर भेटीमागे नेमके काय?

नऊ केंद्रांवर मदतान

गुरुवारी दुपारनंतर प्रचाराला सुरुवात झाली असून उमेदवारांना ५६ तारेखपर्यंत प्रचार करता येणार आहे. त्यानंतर १८ जूनला जिल्हाभरातील एकूण ९ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून वयात ६९९ मतदार मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. तर २२ जूनला मतमोजणी पार पडणार आहे.

माझा बाप काढला : गिते

दरम्यान, गणेश गिते है माघार घेण्यासाठी आले असता, गोकूळ गिते यांनाही माघारीसाठी बोलविण्यासाठी एका कार्यकर्त्याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी मुख्यमंत्री व कुंभमेळामंत्र्यांचे कार्यकर्ते असल्याने आपल्याला माघार घ्यावी लागेल अशी गळ गोकूळ गिते यांना घातली. त्यावर गोकूळ गिते यांनी ‘ज्यांनी माझा बाप काढला, त्यांच्यासाठी माधार का घ्यायची’ असा सवाल केला, ‘दराडे अजुन निवडून आले नाहीत, तरी त्यांची भाषा दादागिरीची व शिवीगाळीची असेल तर पुढे कसे होणार असा सवाल करून आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही’ असे सांगितले. यावेळी गणेश गिते यांनीही गोकूळ गिते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी फोन कट करून टाकला.

विजयाच्या खात्रीनेच उमेदवारी : प्रसाद हिरे

सत्ता व पैशाचा माज असलेल्यांविषयी मतदारांच्या मनात तिटकारा आहे. राजकारणातील स्वच्छ चारित्र्याची व विचारवंताची गरज भरून काढण्यासाठी आपली उमेदवारी आहे. निवडून येण्याची खात्री असल्यानेच निवडणूकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करीत असल्याची प्रतिक्रीया अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Darade gite hire triangular contest ganesh gite withdrawal nashik mlc election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nashik
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.